सिंधुदुर्ग : भारतरत्नासमान लोकनेते, महान स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, दलित आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कार्य करणारे आदरणीय बाबू जगजीवन राम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने बाबू जगजीवन राम नॅशनल फाउंडेशन, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पावरमेंट, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दि. ६ जुलै २०२६ रोजी जि. सिंधुदुर्ग येथील श्रीरंग लाडकोबा देसाई विद्यालय आणि कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय, मु. पो. पाट, ता. कुडाळ येथे झालेल्या या उपक्रमात तब्बल २७७ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
समता, सामाजिक न्याय, शिक्षण, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच बाबू जगजीवन राम यांच्या संघर्षमय जीवनातून नव्या पिढीला प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला नाही, तर सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि समानतेच्या विचारांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षाही अधिक यश मिळवून दिले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिका व कवी श्रीमती वृंदा कांबळी, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सिंधुदुर्ग सभापती श्री प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती यज्ञा साळगावकर, वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य श्री विष्णू फणसेकर, कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, पाट संस्थेचे माजी सचिव सुधीर ठाकूर, सदस्य अंकुश ठाकूर, बाबा तळवडेकर, दीपक पाटकर, राजेश सामंत, संस्था सदस्य तथा निवती सरपंच अवधूत रेगे, सामाजिक कार्यकर्ते तुषार साळगांवकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री सयाजी बोंदर, शिक्षक श्री संदीप साळसकर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक, शिक्षिका दीपिका सामंत, जान्हवी पडते, सिद्धी चव्हाण, हर्षदा कोरगावकर तसेच इतर शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. स्पर्धांचे परीक्षण राजेश गुरव यांनी केले.
उपस्थित मान्यवरांनी बाबू जगजीवन राम यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या योगदानाचा, शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीचा आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या मोलाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येक विद्यार्थ्याने कृतीतून पुढे न्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला, वैयक्तिक गायन, वैयक्तिक नृत्य, समूह गायन आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत दर्जेदार सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.
निबंध स्पर्धेत प्रथम चिन्मयी रामदास कोरगांवकर, द्वितीय आर्या नारायण चांदेकर, तृतीय सहज रवींद्र बुरुड यांनी यश मिळविले. वक्तृत्व स्पर्धेत भक्ती योगेश तेली प्रथम, गायत्री दत्तप्रसाद सामंत द्वितीय, हर्षदा गणेश जोशी तृतीय ठरले. चित्रकला स्पर्धेत शिवराम तुकाराम मेस्त्री प्रथम, वीरेन संतोष नांदोसकर द्वितीय, पूर्वा सुहास जळवी तृतीय आले. वैयक्तिक गायन स्पर्धेत अनुज पांडुरंग मांजरेकर प्रथम, साई प्रमोद वेंगुर्लेकर द्वितीय, अथर्व बाळकृष्ण मराळ तृतीय ठरले. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत वेदश्री महेश दाभोलकर प्रथम, रुता सिद्धेश मार्गी द्वितीय, निधी गिरीधर केळुस्कर तृतीय ठरल्या. समूह नृत्य स्पर्धेत सत्यम शिवम सुंदरम् प्रथम, सहभागी विद्यार्थी रुता सिद्धेश मार्गी, वेदश्री महेश दाभोलकर, तिरंगा द्वितीय, सहभागी विद्यार्थी महेश्वरी गुरुप्रसाद राऊळ, मानवी रुपेश बेळगावकर, श्रावणी चंद्रकांत घाडी, वैष्णवी विश्राम राऊळ, देवांशी सचिन परब, निधी प्रशांत चव्हाण, तर वंदे मातरम् तृतीय, सहभागी विद्यार्थी भक्ती योगेश तेली खोचरेकर, अंतरा सत्यवान दुतोंडकर, युगा गजानन नागोळकर, पूर्वा प्रकाश मुणगेकर, दुर्वा दत्ताराम म्हैसकर यांनी यश संपादन केले. समूह गायन स्पर्धेत प्रथम रितेश देवदत्त राणे, मिहिर उमेश राऊळ, हर्षल दत्ताराम राणे, अर्णव श्रीकृष्ण वायंगणकर, द्वितीय अथर्व बाळकृष्ण मराळ, लक्ष्मण भिकाजी थेंबरे, अक्षय दिनेश राऊळ, वेदांग दिनेश मराळ, महादेव दिलीप मार्गी, तर तृतीय साई प्रमोद वेंगुर्लेकर, आदित्य अमृत देसाई, हर्ष संतोष हळदणकर, विनीत नरेश राऊळ, सर्वेश महेश परब, अनुज पांडुरंग मांजरेकर यांनी पटकावले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण संस्थेचे विभागीय व्यवस्थापक श्री प्रथमेश सावंत तसेच संस्थेच्या वतीने स्वाती मांजरेकर, अमित पाटील, अमोल गुराम, ऋचा पेडणेकर, वैष्णवी म्हाडगुत, सानिका गावडे आणि पल्लवी भोगटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरी आडेलकर यांनी केले. सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी म्हाडगुत यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सामाजिक समता, शिक्षण आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून बाबू जगजीवन राम यांच्या विचारांचा जागर समाजात अधिक व्यापक करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



