Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दाट धुक्याने केला घात! ; तरुण १५०० फूट खोल दरीत कोसळला.

नंदूरबार : काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर अन्वी कामदार हीचा कुंभे धबधब्यात पाय घसरून मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. सेल्फी आणि रिल्सच्या नादात अन्वी कामदारसोबत ही घटना घडली होती. त्यानंतर आता तोरणमाळ येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा तब्बल 1500 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. पाय घसरून तोल गेल्याने मृत तरुन दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दाट धुक्याने केला घात

मिळालेल्या माहितीनुसार चार ऑगस्ट रोजी तोरणमाळ येथे काही तरूण पर्यटनासाठी आले होते. याच तरुणांत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोर पाणी येथील भरत पावरा याचाही समावेश होता. हा तरुण तरुण आपल्या मित्रांसोबत प्रसिद्ध असलेल्या सीताखाई धबधब्याचा परिसरात गेले होते. पण यावेळी त्याचे मित्र पुढे निघून गेले. या परिसरात दाट धुके होते. त्यामुळे भरत पावरा हा  मागे राहिल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले नाही. सायंकाळी घरी जात असताना भरत नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक गावकरी आणि नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. सलग दोन दिवस परिसरात त्याच्या शोध घेण्यात आला. मात्र त्याचा शोध न लागल्याने म्हसावद पोलिसात तक्रार करण्यात आली.

दरीत एक मृतदेह असल्याची पोलिसांना मिळाली माहिती

त्यानंतर खोल दरीत एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर दरीत आढळलेला मृतदेह हा बेपत्ता भरत याचाच असल्याचे पोलिसांना समजले. दाट धुकं असल्याने मृत तरुणाला दिसले नसावे. परिणआम पाय घसरून खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

उपायोजना करण्याची केली जातेय मागणी

तोरणमाळ या पर्यटनस्थळी अनेक तरुण जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचा नाद करता. त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा दुर्घटना होते. त्यामुळेच या परिसरात योग्य त्या उपायोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles