दोडामार्ग : शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळपासून जनतेचे अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे – परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात झोळंबे गावातून सुरुवात करण्यात आली. यावेळी झोळंबे, तळकट, कोलझर, कुंब्रल, शिरवल, कुडासे, भरपाल, मणेरी, सासोली, कळणे, आडाळी, मोरगाव येथील सर्व ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत तसेच खळा बैठका घेत प्रचारामध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळाली.

यावेळी सौ. अर्चना घारे – परब या म्हणाल्या, आज या विधानसभा मतदार संघात असलेले प्रश्न हे माझे प्रश्न आहेत. मी एक सर्वसामान्य जनतेची प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहिन. आज जर आपण पाहिले तर कोकणातील सत्ताधारी नेते हे रोज सकाळी उठून प्रेस घेतात आणि एकमेकांवर टीका , चिखलफेक करत आहेत. यांना इथल्या आरोग्य , रोजगार , आडाळी एमआयडीसी असे अनेक मोठे प्रश्न आहेत हे सोडवायला काही सोयरसुतक नाही आहे. शेतकरी बांधवांचे हमीभाव , पीक विमा ,असे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवायला यांना वेळ नाही आहे. आणि शेवटी मग मत विकत घ्यायची आणि निवडून यायचे असे यांचे ठरले आहे. आताची ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. एका बाजूला सर्व बलाढ्य नेते मंडळी विरुद्ध माझी सर्वसामान्य जनता अशी ही निवडणूक होत आहे. परंतु माझी जनता ही विकली जाणार नाही असा विश्वास देखील अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला.तेव्हा आता या सर्वांना समजून चुकले आहे की अर्चना घारे हे एक वादळ आहे आणि आम्ही सर्वजण मिळून तळागाळात शेवटच्या घटकांपर्यंत काम करतो हे त्यांनी बघितले आहे. त्यामुळे आता मला हे तुमचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्ही मला एक मत द्या माझ उर्वरित आयुष्य तुम्हाला देईन , तुमच्या लोकसेवेसाठी देईन एवढा विश्वास ठेवा आणि मला ३ नंबर पाकीट या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी कराल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी अर्चना घारे परब यांच्या समवेत श्री. संदीप गवस , प्रदीप चांदेलकर , ममता नाईक , प्रिया देसाई , सुदेश तुळसकर , उल्हास नाईक , सुभाष लोंढे , गौतम महाले , आनंद तुळसकर , सागर नाईक , रविकिरण गवस , रिद्धी मुंगी , माधुरी वेटे , प्रतीक्षा मुंगी , सुनिता भाईप , मयुरी भाईप , राधिका धुरी , अलीशा गोठसकर आदी सर्व ग्रामस्थ , महिला , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त करत अर्चना घारे परब यांना शुभेच्छा दिल्या.


