सावंतवाडी : तालुक्यातील चौकुळ गावातील भाजप पक्षाचे कार्यकर्ते विश्वास सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी आमदार तथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. राजन तेली यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी राज्यमंत्री श्री. प्रवीण भोसले, चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



