Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

राजन तेली मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.! : मायकेल डिसोझा.

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकेल डिसोझा यांनी व्यक्त केला. तसेच नवीन प्रवेशामुळे दीपक केसरकरांच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. ते शिवसैनिक गुप्तपणे आमचं काम करत असून ते निकाला दिवशी दिसेल असा गौप्यस्फोट देखील केला. तर बाळा गावडे कधी आले, कधी गेले ? ते समजल नाही. ते एका घरात समाधानी नसतात. ते सर्व घर फिरणारे आहेत. त्यांच्यावर काय बोलणार असाही खोचक टोला हाणला. येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. डिसोझा पुढे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून उद्या त्यांची सावंतवाडीत सभा होत आहे. यामुळे शिवसैनिकांत उत्साहाच वातावरण असून तिन्ही विधानसभेत भगवा फडकणार आहे असा विश्वास व्यक्त केला. तर विद्यमान आमदारांना संधीच सोन करता आलं नाही. काही कार्यकर्ते त्यांना कालपर्यंत शिव्या देत होते ते आज त्यांच्याकडे खिरापतीला दिसत आहेत. ही खोक्यांची कमाल आहे. म्हणून, ते लोक केसरकरांच्या आजूबाजूला दिसत आहेत. कोणत्याही प्रकारचे वाटप आम्ही या लोकांना करू देणार नाही. त्यांच्या तालुकाप्रमुखांना एक काम ठोसपणे सांगता येत नाही. मात्र, आपणाला बिनविरोध निवडून दिलं पाहिजे अस केसरकर सांगत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी ३३ कोटी दिलेले असताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ते करू शकले नाहीत. त्यांचा विकास अदृश्य आहे. त्यामुळे पैशाच आमिष दाखवून इतर पक्षातले कार्यकर्ते त्यांना फोडावे लागत आहेत. आमच्याकडे स्थान नसलेले कार्यकर्त्यांच्या कुबड्या घेऊन केसरकर चालत आहेत. कितीही काही केलं तरी सावंतवाडीची जनता आता भुलणार नाही असं विधान मायकल डिसोझा यांनी केले‌.

दरम्यान, दहशतवादाचा बागुलबुवा करून केसरकर यांनी राणेंवर टीका केली. आज त्याच नारायण राणेंसह ते बसत आहेत. शेवटची टर्म म्हणून सांगणारे आज पुन्हा आमदारकीला उभे आहेत अशी टीका त्यांनी केली. तर लोकच त्यांना मतपेटीतून उत्तर देतील. या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकून राजन तेली निवडून येतील असा विश्वास उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांनी व्यक्त केला. विकास केला असता तर इतर पक्ष फोडण्याची गरज केसरकर यांना पडली नसती. आज प्रवेश करणारे बाळा गावडे कधी आले कधी गेले ? ते समजल नाही. ते एका घरात समाधानी नसतात. ते सर्व घर फिरणारे आहेत. त्यांच्यावर काय बोलणार असाही खोचक टोला श्री. डिसोजा यांनी हाणला. तर राजन तेली हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करताना नवीन प्रवेशामुळे केसरकरांच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. ते गुप्तपणे आमचं काम करत असून ते निकाला दिवशी दिसेल असा गौप्यस्फोट देखील केलाय.यावेळी माजी सरपंच शिवदत्त घोगळे,युवासेना उपतालुकाप्रमुख
शैलैश टिळवे आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles