संजय पिळणकर
सावंतवाडी : सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने ग्रंथालयाच्या वतीने मंगळवार दी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सातार्डा टिळक ग्रंथालय येथे सकाळी ९.०० वाजता तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा शाळा स्तरावर दोन गटात आयोजीत करण्यात आली आहे.इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतर्फे सदर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ग्रंथालयामार्फत करण्यात येत आहे.
ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार असून गट क्रमांक १ मध्ये १४ वर्षा खालील व गट क्रमांक २ मध्ये १९ वर्षाखालील अशी घेण्यात येणार असून प्रत्येक गटात प्रत्येक प्रशाळेमधून जास्तीत जास्त दोन (२) स्पर्धक सहभागी होऊ शकतील.
या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना १०००, ७००, ५०० रूपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येतील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली नाव नोंदणी प्रशालेचे नाव व गटासह दी २२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत (९४२१२६५७५१) या भ्रमणध्वनीवर वॉट्सअप करावीत,असे आवाहन अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी केले आहे.
या स्पर्धेत प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या प्रत्येक गटातील ३५ स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी केले जाईल.


