सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आज सावंतवाडी येथील गांधी चौकात दुपारी तीन वाजता गांधी चौकात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ह्याच ठिकाणी राजन तेली यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली होती. त्यावेळी त्यांनी केसरकरांवर टीका केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे विरोधकांच्या कसा समाचार घेतात?, याकडे सावंतवाडीकरांसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



