कणकवली : क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक १३ ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय कॅरम आंबोली सैनिक स्कूल ता. सावंतवाडी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनी कु. श्रेया राजेंद्र महाडीक (इ. १०वी ) हिने उत्कृष्ट कॅरम खेळाचे प्रदर्शन करत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात पाचवा क्रमांक प्राप्त करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली. तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये ती आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. गतवर्षी सुद्धा याच प्रशालेच्या कु. दिक्षा चव्हाण हिने राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले होते.
क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबईचे विद्यमान संचालक सन्मा. श्री. सतीश सावंत व सर्व सन्माननीय पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी श्रेयाचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कु. श्रेया हिला प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी अध्यापक आणि कॅरम प्रशिक्षक श्री. मकरंद आपटे, क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण, जिल्ह्यातील ख्यातनाम कॅरम खेळाडू श्री. गौतम यादव यांचे मार्गदर्शन लाभले.


