सावंतवाडी : यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. निरंतर अभ्यास, संशोधक वृत्ती आणि ध्येयाचा ध्यास यामुळे जीवनात यश गाठता येते. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी प्रचंड जिद्द बाळगून मेहनत घेतल्यास कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते. पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी कष्टाची तयारी ठेवा, असा सल्ला मौलिक सल्ला सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर प्रा. राजाराम परब यांनी सावंतवाडी येथे दिला.
शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी येथे आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट अकॅडेमी सावंतवाडीचे संचालक प्रा. राजाराम महादेव परब यांचा ‘यशस्वी भव’ मार्गदर्शन सेमिनार यशस्वीरित्या संपन्न झाला. यावेळी प्रा. परब बोलत होते.
यावेळी सदर सेमिनारला इयत्ता दहावीचे एकूण १०० विद्यार्थी, NEET/JEE/MHT-CET मार्गदर्शक शिक्षक राजू विश्वास, तसद्दूक मलिक, अवनीश वर्मा, मो. जामीन सैफी, अकॅडमीचे शिक्षकेत्तर कर्मचारी अमोल खरात, पूर्वी जाधव, परिमल धुरी, शितल कांबळी आदि उपस्थित होते.
प्रा. राजाराम परब यांनी विद्यार्थ्यांना NEET, JEE आणि MHT-CET परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना यशाच्या वाटचालीसाठी आवश्यक असणारे गुण, अभ्यासाचे तपशीलवार टीप्स आणि परीक्षेच्या तयारीसाठी योग्य ध्येय धोरणे सांगितली.
यावेळी उपस्थित राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे मुख्याध्यापक जगदीश धोंड म्हणाले, हा सेमिनार विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरला. आम्ही प्रा. राजाराम परब यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा सेमिनार आयोजित केला व अमूल्य मार्गदर्शन केले.
या सेमिनारचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका सौ. मृणालिनी कशाळीकर यांनी आभार व्यक्त केले. सेमिनारच्या समारोपाच्या वेळी, विद्यार्थ्यांनी प्रा. परब यांचे आभार मानले आणि त्यांनी मिळालेल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.


