Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

धमकी देणे केसरकरांची संस्कृती नाही, केसरकर प्रेमाने मने जिंकतात.! :अशोक दळवी.

सावंतवाडी : आपल्या कार्यकर्त्यांना राणे यांच्या करवी केसरकर धमकी देतात , असा प्रचार विरोधी उमेदवार राजन तेली करीत आहेत. मात्र, धमकी देण्याची प्रवृत्ती ही केसरकर यांची नाही . केसरकर हे जनतेच्या मनातील आमदार व मंत्री आहेत . त्यांना कधी कोणाला धमकी देण्याची गरज नाही . कार्यकर्त्यांची व मतदारांची मने ते प्रेमाने जिंकतात मात्र पराभव दिसू लागल्याने राजन तेली हे केसरकर यांच्यावर कुणालाही न पटणारे धमकी दिली असे आरोप करत आहे . केसरकार धमकी देतात . हे कुणालाही पटणार नाही . त्यामुळे राजन तेली ना मतपेटीतून जनताच उत्तर देणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केले.
दळवी पुढे म्हणाले , राजन तेली यांची पडीक उमेदवार म्हणून जनमानसात प्रतिमा आहे जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांना जनतेने नाकारले आहे. दोन वेळा जिल्हा बँक निवडणुकीत , दोन वेळा विधानसभा निवडणुकीत जनतेने त्याचा नाकारले आहे केस रकारांचे कार्य व तेलींची प्रतिमा यांची तुलनाच होऊ शकत नाही. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या तेलीना आता पुढच्या निवडणुकीत तुमचा कुठचा पक्ष असणार असा सवाल मतदाराच करीत आहेत उभाटा शिवसेनेला अन्य उमेदवार न मिळाल्यामुळे तेली यांना आयात करून उमेदवारी द्यावी लागली तर अन्य अपक्ष दोन उमेदवार नवखे आहेत. निवडणूक झाल्यानंतर ते कुठे असणार याचा अंदाज मतदार बांधत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनामनात आदराचे स्थान निर्माण केलेल्या महायुतीचे उमेदवार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा या निवडणुकीत एकतर्फी विजय होणार आहे असे दळवी म्हणाले.
दळवी पुढे म्हणाले , गेले पंधरा दिवस प्रचाराच्या निमित्ताने आम्ही मतदारसंघातील गावागावात फिरत आहोत. पण, कुठेही आम्हाला चुरस दिसली नाही. उलट मतदारच सांगत आहेत, केसरकारांच्या कार्याची तुलना होऊच शकत नाही . अनेक वर्ष मोठ्या पदावर वावरत असताना कसलाही त्यांना गर्व नाही . प्रत्येकाशी ते सौजन्याने वागतात. कुणाचाही फोन घेतात. या मतदारांच्या प्रतिक्रिया या त्यांच्या जनमानसातील उच्च कोटीच्या प्रतिमेची साक्ष करून देतात . आज विरोधक केसरकरांनी काहीच केले नाही, असा अपप्रचार करत आहेत . मात्र काहीच काम केले नाही तर गावागावात , शहरात जी विकासकामे दिसत आहे ती जादूच्या कांडीमुळे झाली आहेत का ?जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना उगाच मिळत आहे का? याउलट तुम्ही काय काम केली ते जाहीर करा. तुमच्या बैठकांना असणारी तुरळक गर्दी बरेच काही सांगून जाते . केसरकरांनी केलेली कामे सांगूनही संपणार नाहीत. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे विरोधी पक्षातील आमदारही त्यांचा आदर करतात. पण स्वार्थी प्रवृत्तीने बरबटलेल्यांना टीका करण्यापलीकडे काही सुचत नाही . गेल्या अनेक वर्ष राजकारण व समाजकारणात वावरताना त्यांनी आपली जनमानसातील प्रतिमा उंचावली. त्यांच्या कारकीर्दीत कुठच्याही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाला नाही किंवा कुठचाही गुन्हा त्यांच्यावर नाही. त्यांच्या लोकप्रियतेमुळेच समाजात प्रत्येक घटक त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहे . त्यांना सर्व स्तरातून मिळणाऱ्या पाठिंबा, त्यांच्या बैठका व सभांना होणारी गर्दी पाहून आता उत्सुकता फक्त किती मताधिक्य मिळणार याचीच आहे . केसरकारांच्या विजयी रथात आरूढ होण्यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आता सज्ज झाले आहेत. महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते केसरकर यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी जीव ओतून काम करत आहे. विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार व पुन्हा एकदा केसरकर यांना राज्यातील मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळणार, असा ठाम विश्वास जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles