Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

‘महायुती’ की ‘महाविकास आघाडी’?, उत्सुकता शिगेला.! ; विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार, सकाळी ८ वाजता सुरू होणार मतमोजणी.

मुंबई : राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघात मतमोजणी केंद्र तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी होणार आहे.

राज्यात यावेळी पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. निवडणूक कर्मचारी, पोलिस यंत्रणा, ८५ वर्षांपेक्षा अधिक वृद्ध, विकलांगांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतमोजणीची सुरुवात ही पोस्टल मतदाणाच्या मतमोजणीने केली जाणार आहे. या निवडणुकीत ८५ वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या ६८००० हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि १२००० पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींनी गृह मतदानाचा लाभ घेतला. ३६००० हून अधिक अत्यावश्यक सेवा मतदारांनी पोस्टल मतपत्रिकांद्वारे मतदान केले. तब्बल ४,६६,८२३ पोस्टल मतपत्रिका निवडणूक कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या होत्या. सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे २८८ मतमोजणी केंद्रांवर १७२३ टेबल्स टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी आणि ५९२ टेबल्स इटीपीबीएमएस स्कॅनिंगसाठी (पूर्व-मोजणीसाठी) उभारण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रांच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी बाबत प्रसिद्धी दिली आहे. निवडणूक लढविणारा उमेदवार, राजकीय पक्षांना मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणाबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. निरीक्षक व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर सीलबंद स्ट्राँग रूम्स उघडण्यात येतील व ईव्हीएम मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सी.सी. टीव्हीद्वारे चित्रित केली जाईल. तीन- स्तरीय सुरक्षा व्यवस्था निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी तयारी पूर्ण केली आहे. तब्बल २८८ मतदार संघाचे निकाल हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपडेट केले जाणार आहे. त्यामुळे निकालाची अधिकृत आकडेवारी ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles