सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक असून मतदारांचा कौल मला मान्य आहे.
महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय आहे. राजकारणाचा स्थर खूपच खालावलेला आहे. अनेक अफवा पसरवून राजकारण केले गेले. महिलांना धमकावण्याचे प्रकार देखील झालेत. सावंतवाडीच्या संस्कृतीला साजेशी निवडणूक झाली नाही, असे मत अपक्ष लढलेल्या एकमेव महिला उमेदवार अर्चना घारे – परब यांनी व्यक्त व्यक्त केले.
ना पक्ष ना चिन्ह, ना कोणताही नेता, फक्त प्रामाणिक कार्यकर्ते घेऊन मी स्वाभिमानाची लढाई लढले. झालेला पराभव मला मान्य असून मी आत्मचिंतन करून माझा प्रामाणिक प्रवास सुरू ठेवणार असून यापुढे देखील माझ्या सावंतवाडी मतदार संघाच्या विकासात्मक बाबीत जे जे विधायक करता येईल ते करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही अर्चना घारे – परब म्हणाल्या.


