Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पक्षाला मारक ठरलेल्या व्यक्तिला पुन्हा भाजपात स्थान नाही! : मनीष दळवी. ; केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी, यात भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मोठं योगदान.

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले यात भाजपच्या कार्यकर्त्यांच योगदान मोठं आहे. काहींनी वातावरण बिघडण्याच काम केलं. मात्र, पक्षाला, नारायण राणे, पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांना मानणारा कार्यकर्ता महायुती सोबत राहिला. भाजपाचा उमेदवार समजून काम केलं. त्यामुळे संभ्रम करणार वक्तव्य कोणी करू नये, असा सल्ला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी भाजप नेते माजी आमदार प्रमोद जठार यांना दिला. निवडणूकीत रक्ताचं पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटाव व नंतर कोणाचे गोडवे गायचे असतील तर गावे, असा टोला हाणत राणेंवर आरोप केलेल्या, पक्षाला मारक ठरलेल्या माणसाला पुन्हा भाजपात स्थान दिलं जाणार नाही. ही सामान्य कार्यकर्त्यांचीही भुमिका आहे असे मत श्री. दळवी यांनी व्यक्त केले. येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मनीष दळवी म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयात भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मोठ योगदान होत. त्यामुळे भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना धन्यवाद देतो. यावेळच्या निवडणूकीकडे बारकाईने लक्ष होता. काही शक्ती या ठिकाणी वावरत होत्या. महायुतीच्या उमेदवाराचा पराभव त्यांना करायचा होता. मात्र, खास. नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आदेश दिले. काहीजण सवयीप्रमाणे पक्ष सोडून गेले, बंडखोरी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला होता‌. हा संभ्रम दूर करण्यासाठी रविंद्र चव्हाण यांना चारवेळा यावं इथे लागलं. नारायण राणे यांनी दौरा करत आपली भुमिका कार्यकर्त्यांना सांगितली. काहींनी पक्षाशी गद्दारी करत उमेदवारी दाखल केली. ऑडिओ क्लिप व्हायरल करत वातावरण बिघडण्याच काम केलं. मात्र, पक्षाला, राणे व चव्हाण यांना मानणारा कार्यकर्ता महायुतीच्या सोबत राहिला असं मत त्यांनी व्यक्त केल.

दरम्यान, भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी एक विधान केलं. विशाल परब यांच्यामुळे नाही तर रक्ताच पाणी करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय झाला आहे. जठार यांनी या मतदारसंघात यावं व निवडणूकीत रक्ताच पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटाव आणि नंतर कोणाचे गोडवे गायचे असतील तर गावे असा सल्ला श्री. दळवी यांनी दिला. हा विजय महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मेहनतीचा आहे. या ठिकाणी गद्दारी, बंडखोरीमुळे कोणाचा फायदा झाला नाही. विरोधकांची मते एक केली तरीही केसरकरांरपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे नेत्यांनी अशी विधानं करून भाजपच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या कष्टाचा अवमान करू नये. इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याशिवाय अशी विधानं करू नयेत असं मत दळवी यांनी व्यक्त केल. यापुढील काळात भाजपच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आमचा भर आहे. बंडखोरांवर कोणाचं प्रेम असेल तर तेव्हा उमेदवारी न भरण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता. अशी प्रवृत्ती इथे आम्हाला नको आहे. चुकीच्या प्रवृत्तीला पक्षात स्थान देऊ नये. संभ्रम निर्माण करणार विधान यापुढे कोणी करू नये. विशाल परब यांची पुष्पगुच्छ देण्याची पात्रता नाही. चुकीची प्रवृत्ती जवळ करण्याची भूमिका भाजपचा कार्यकर्ता अन् नेतेही घेणार नाही. राणेंवर आरोप केलेल्या माणसाला स्थान दिलं जाणार नाही. कोणी प्रयत्न करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. पक्षाच नुकसान करणारा, नेत्यांवर आरोप करणारा असा कोणीही आमच्या पक्षात नको आहे. गंमती जंमतीच्या विधानांना सावंतवाडीत स्थान देणार नाही. या निवडणूकीत गंमती जंमतीच नुकसान कार्यकर्त्यांना भोगाव लागलं. ज्या माणसानं राणे यांच्यावर आरोप केलाय त्यांना भाजपात स्थान नाही. जे चुकीचे उद्योग काही मंडळी करत आहेत त्यांची चौकशी होणार आहे. स्वतः नारायण राणे यांनी त्याची दखल घेतली आहे अशी माहिती श्री. दळवी यांनी दिली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप जिल्हा संघटक महेश सारंग, मंडल अध्यक्ष महेश धुरी आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles