सावंतवाडी : सावंतवाडीचे सुपुत्र सुधीर श्रीकृष्ण वंजारी (७ डिग्री ब्लॅक बेल्ट, आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच) यांनी गोवा येथे नुकत्याच झालेल्या (FSKA) २४ व्या वर्ल्ड कप कराटे स्पर्धेत ‘काता’ या प्रकारात ‘सिल्वर मेडल’ व ‘कुमिते’ (फाईट) या प्रकारात ‘सिल्वर मेडल’ अशी दोन मेडल्स जिंकली. ही स्पर्धा पेंडेम इंडोअर स्टेडियम म्हापुसा (गोवा) येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत जगातील १८ देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा हेन्शी हसन इस्माईल यांनी वर्ल्ड फुनाकोशी शोतोकॉन कराटे ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत भरविण्यात आली होती. यात सावंतवाडीचे सुपुत्र शिहान – सुधीर श्रीकृष्ण वंजारी हे गेली ४५ वर्षे जपान कराटे असोसिएशन डब्ल्यू एफ इंडिया या संस्थेमध्ये कराटेचा सराव करत आहेत. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच देशांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अनेक मेडल्स जिंकले आहेत. तसेच ते दोन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांना जेकेएडब्ल्यूएफ इंडिया, महाराष्ट्र संस्थेच्या वतीने शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.
सावंतवाडीचे सुपुत्र सुधीर वंजारी यांचा वर्ल्ड कप कराटे स्पर्धेत डंका.! ; जिंकली दोन रजत पदके.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


