कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे स्वरचित काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा दोन गटात घेतल्या जातील.पाचवी ते दहावी पर्यंत (विद्यार्थी गट) तसेच
खुल्या गटासाठी.स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
तरी सहभागी स्पर्धकांनी आपली एक स्वरचित कविता आठ डिसेंबरपर्यंत पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे
कविता पाठवताना आपले नाव, पत्ता लिहावा. तसेच मोबाईल नंबर असावा.
विद्यार्थ्यांनी शाळा व इयत्ता लिहावी
कविता स्वरचित, मराठी भाषेत असावी.
सूरज कणबरकर (कावळेवाडी – ता.जि.बेळगाव), भाग्यश्री कदम (सहाय्यक शिक्षिका – बालवीर विद्यानिकेतन, बेळगुंदी), तेजस्विनी कांबळे (प्राथमिक शाळा, बिजगर्णी) या पत्यावर पाठवावे.
पहिल्या तीन क्रमांकाना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
तरी अधिक माहितीसाठी संपर्क करावा – श्री. वाय. पी. नाईक (9420204105)
असे आवाहन पी. आर. गावडे, अॅड. नामदेव मोरे यांनी केले आहे.
ADVT –




