Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

वेंगुर्ले भाजपच्या वतीने संगीत विशारद सचिन पालव यांचा सत्कार.! ; औचित्य जागतिक दिंव्यांग दिनाचे.

वेंगुर्ला : जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.
शारीरिक किंवा मानसिक तृटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून या दिवसाची योजना आहे. अपंगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो.
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने दरवर्षी जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात . यावर्षी वेंगुर्ले शहरातील वडखोल येथील सचिन पालव यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जन्मताच दृष्ट्रीहीन असलेला सचिन पालव यांनी गेली अनेक वर्षे संगीत साधना करुन, अंधत्वावर मात करून जिद्द् व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तबला , हार्मोनियम व गायन या तीनही विषयामध्ये विशारद पदवी प्राप्त करुन समाजासमोर नवा आदर्श प्रस्थापित केला. याबद्दल त्याचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि.का.का. सदस्य मनवेल फर्नांडिस, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व मनोहर तांडेल, बुथ प्रमुख सुधीर पालयेकर, शेखर काणेकर, रवींद्र शिरसाठ, भाई पालव, श्री. सावळ आदी उपस्थित होते.

ADVT – 

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles