Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

बालकांच्या प्रतिभाशक्तीला आता मिळणार चालना, कारण संदीप गावडे फाऊंडेशन आहे ना.! ; ‘यशवंत’ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२५ चे आयोजन.

सावंतवाडी : कोकणातील विद्यार्थी हुशार व गुणवत्ता संपन्न असतात. मात्र स्पर्धा परीक्षेबाबत अजूनही हवा तसा नावलौकिक कोकणातील विद्यार्थी मिळू शकले नाहीत. हीच गुणवत्ता स्पर्धा परीक्षेत टिकावी यासाठी संदीप गावडे फाऊंडेशनने आता पुढाकार घेऊन यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा – 2025 चे आयोजन केले असून प्रथमतः ही स्पर्धा परीक्षा सावंतवाडी तालुका मर्यादित आयोजित करण्यात आली आहे.

*परीक्षेबाबत महत्त्वाच्या बाबी-*

*१)शैक्षणिक गुणवत्ता उंचावून स्वप्न साकार करण्याचे विशेष ध्येय* .
२) *स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करण्यासाठी इयत्ता चौथीसाठी पहिला टप्पा सुरू नंतर पुढील इयत्तेप्रमाणे दरवर्षी* *परीक्षेचे आयोजन केले जाईल* .
३) *गुणवंत विद्यार्थ्यांची शोध प्रक्रिया याच माध्यमातून.*
४) *परीक्षा नोंदणीसाठी केवळ स्वागत मूल्य*.*(१००/-परीक्षा शुल्क)*
५) *विशेष टॉप ५ विद्यार्थ्यांना सायकल स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात येईल.*

*या व्यतिरिक्त इतर गुणवंत विद्यार्थ्यांनाआकर्षक बक्षीस योजना*

** *१) पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 50* *सुवर्णपदक व भेटवस्तू*
** *२) पुढील 50** *विद्यार्थ्यांना50 रौप्य* *पदक , व भेटवस्तू*
** 3 ) *यापुढील पन्नास विद्यार्थ्यांना 50 कांस्य पदक व भेटवस्तू* .
*उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.*

*विशेष सूचना*
१) परीक्षा केंद्र लिहिताना बीटाचे नाव लिहावे.
२) आंबोली व चौकूळ यांच्याकरिता आंबोली हे केंद्र राहील.
३) फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 ही राहील.
४) परीक्षेची संभाव्य तारीख रविवार 9 मार्च 2025 ही राहील. (यामध्ये काही बदल असल्यास वेळीच कळवले जाईल.) वेळ सकाळी 11 ते 1 अशी राहील. परीक्षा केंद्रावर मुलांनी किमान अर्धा तास अगोदर हजर राहावे.
५) प्रत्येक बीटातील परीक्षा केंद्र हे मागावून कळवले जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क –

– अध्यक्ष –
श्री .सुधीर गावडे – 9390267607

– सचिव –
श्री. दत्ताराम सावंत – 94 23304581

यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा -2025

 

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles