Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कर्मचाऱ्याला तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याने नांदगाव येथील ‘त्या’ पेट्रोल पंपाविरुद्ध जनतेत संताप.! ; कामावरून काढून टाकलेल्या सुयोग मुणगेकरवर कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड.

. तो पेट्रोल पंप माजी आमदार वैभव नाईक यांच्याशी संबंधित.
. कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार!
. भाजपचे भाजप उप तालुका अध्यक्ष संदीप सावंत आणि शक्ती केंद्रप्रमुख राजू हिर्लेकर आक्रमक.

कणकवली: माजी आमदार वैभव नाईक यांच्याशी संबंधित असलेल्या नांदगाव येथील नाईक पेट्रोल पंपावरून एका कामगाराला भाजपचा प्रचार केला म्हणून तडकाफडकी कामावरून काढून टाकण्याची संतापजनक घटना नांदगाव येथील नाईक पेट्रोल पंप येथे घडली. या पेट्रोल पंपावर प्रामाणिकपणे काम करत असलेल्या खेळणे खुर्द येथील एका तरुणाला कामावरून काढून टाकण्यात आले. या घटनेमुळे या पंचक्रोशीत नाईक यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात असून कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घ्या अन्यथा पेट्रोल पंपाच्या मलका विरुद्ध तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे उपतालुका अध्यक्ष संदीप सावंत आणि शक्ती केंद्रप्रमुख राजू हिर्लेकर यांनी दिला आहे.
खेळणे खुर्द येथील सामान्य कुटुंबातील सुयोग श्यामसुंदर मुणगेकर हा नाईक यांच्या नांदगाव येथे पेट्रोल पंपावर काम करत होता. विधानसभा निवडणुकीच्या दरम्याने तो सुट्टीच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात फिरत असल्याचे समजल्यानंतर नाईक पेट्रोल पंप वरून मुणगेकर याला कामावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आले. त्यामुळे त्याच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला. बेरोजगार झालेल्या मुणगेकर कुटुंबाबद्दल पंचक्रोशीत सहानुभूती निर्माण झाली असून जनतेतून संतापही व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे उप तालुका अध्यक्ष संदीप सावंत आणि शक्ती केंद्रप्रमुख राजू हिर्लेकर यांनी त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रसंग आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles