बंगळुरू : अजिंक्य रहाणे याच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर मुंबई क्रिकेट टीमने सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईने हा सामना 6 विकेट्सने जिंकला आहे. बडोदाने मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. मुंबईने 17.2 ओव्हरमध्ये 164 धावा केल्या. अजिंक्य रहाणे मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रहाणेने या हंगामात सलग तिसरं अर्धशतक ठरलं. तर रहाणेचं अवघ्या 2 धावांसाठी शतक हुकलं. मात्र रहाणेने या खेळीसह मुंबईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. तर कॅप्टन श्रेयस अय्यर याने 46 धावांची खेळी करत रहाणेला चांगली साथ दिली. आता अंतिम फेरीत मुंबईचा सामना हा दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यीतल विजयी संघाविरुद्ध होणार आहे.
ADVT –




