सावंतवाडी : निळेली येथील महेश नामक युवक (वय वर्ष 32) व त्यांची पत्नी मोटर सायकलने घरी जात असताना मळगाव पुलावर म्हैस आडवी आल्याने अपघात घडला.
हा अपघात आज रात्री आठ वाजता घडला. अपघातामध्ये महेश यांच्या तोंडाला जबर मार बसला आहे तर महेशच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली.
महेशने दहा मिनिटे अगोदर आपल्या पत्नीला स्वतःचे हेल्मेट दिलं होतं. त्यानंतर काही मिनिटात हा अपघात घडला. हेल्मेटमुळे आपला जीव वाचला, असं त्याच्या पत्नीने सांगितलं तर सकाळीच आपल्या मित्राकडून आपल्या पतीने हेल्मेट मागून घेतलं होतं, असेही त्या म्हणाल्या. सदर रुग्णाला सावंतवाडी रुग्णालयामध्ये श्री. राणे यांनी आपल्या ॲम्बुलन्सने आणलं. प्राथमिक उपचारानंतरव पुढील अधिक उपचारासाठी त्यांना ओरोस येथे पाठवण्यात आले.
याकरिता सामाजिक बांधिलकीचे सदस्य रवी जाधव व राणे यांनी त्यांना मदत कार्य केले त्यांचे आभार त्यांच्या कुटुंबीयांनी मानले.
मळगाव पुलावर म्हैस आडवी आल्याने पती-पत्नी अपघातात जखमी ; पुन्हा मदतीला धावली सामाजिक बांधिलकी.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


