Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अखेर विधान परिषदेला मिळाला नवा सभापती! ; मुख्यमंत्र्यांनी मानले विरोधकांचेही आभार.

नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता त्यांचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर आता अनेक राजकीय गणित बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता भाजप नेते प्रा. राम शिंदे यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असेल तरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा भाजपच्या गळ्यात पडली. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक होत्या. विधानपरिषदेचे सभापतीपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र विधान परिषदेतील संख्याबळामुळे भाजपने स्वत:कडे सभापतीपद ठेवत शिवसेनेला धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपमधून राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७ जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. राम शिंदे यांनी काल विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. या पदासाठी अर्ज करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. तर सभापतीपदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेचे सभापतीपदासाठी फक्त राम शिंदे यांचा अर्ज दाखल झाला होता. यामुळे भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles