Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सक्षमता ओळखून ध्येय निश्चिती केल्यास यश निश्चित! : प्रा. रुपेश पाटील ; न्यू इंग्लिश स्कूल मडुरा येथे ‘करिअरच्या वाटा व संधी’ विषयावर व्याख्यान, एसएससी बॅच १९८४-८५ व ज्ञानदीप मित्र मंडळाचा पुढाकार.

सावंतवाडी : विद्यार्थी दशेत मिळालेले संस्कार हेच आपल्या भविष्यातील यशाचे यशाची वाट पक्की करत असतात. कोणतेही यश सहज मिळत नाही, त्यासाठी प्रत्येकाला स्वक्षमता ओळखून ध्येय निश्चिती करावी लागते. असे केल्यास हमखास यश मिळते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा येथे ‘करिअरच्या वाटा व संधी’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भिकाजी शंकर धुरी, मुख्याध्यापिका सायली परब तसेच १९८४ – ८५ बॅचचे विद्यार्थी तुलसीदास असवेकर, उदय रेडकर, शालेय समिती सदस्य जगन्नाथ धुरी, श्रीकृष्ण भोगले, ज्योती राणे, तसेच करिअर मार्गदर्शक प्रा. मिलिंद देसाई, यशवंतराव भोसले नॉलेज सिटीचे संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काटे आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सायली परब तसेच तुलसीदास असवेकर, उदय रेडकर व जगन्नाथ धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ‘करिअरच्या वाटा व संधी’ या विषयावर बोलताना प्रा. रुपेश पाटील यांनी इयत्ता दहावीनंतर सध्य:स्थितीत कोणकोणते विशेष अभ्यासक्रम व हमखास रोजगार व नोकरी मिळवून देणारे आधुनिक कोर्सेस आहेत, याची पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारा माहिती दिली. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि एनडीए व तत्सम स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती विशद केली.

दरम्यान प्रा. पाटील पुढे म्हणाले कोकणातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी आहेत. येथील नैसर्गिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेचा विकास आपसूकच होतो. विलक्षण बुद्धिमत्ता असतानाही मात्र केवळ मार्गदर्शन नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेत आपल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणावर पालक वर्ग उपस्थित होता. ज्ञानदीप मित्र मंडळ व १९८४-८५ एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सायली परब व तुलसीदास असवेकर यांनी, केले तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक सुरेश सावंत यांनी केले.

दरम्यान कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक एस. के. वराडकर, एस. डी. कांबळे, आर. पी. सावंतभोसले, व्ही. बी. चव्हाण, महेश नाईक, ए. एन. कुरणे, सौ. मृणाल तोरस्कर, सौ. रेश्मा सावंत, सौ. प्रतिभा सावंत तसेच शिक्षकेतर कर्मचारी नाना सावंत, प्रशांत गोसावी, एकनाथ राऊळ, राजू कांबळे व अनिल परब आदी उपस्थित होते.

दरम्यान एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी तुलसीदास असवेकर, उदय रेडकर, शालेय समिती सदस्य जगन्नाथ धुरी, श्रीकृष्ण भोगले, संतोष गावडे, रामदास परब, भाऊ वराडकर, उदय रेडकर, ज्ञानेश परब, लक्ष्मण गावडे, तानाजी गावडे, प्रकाश पंडित, विलास भाईप, बाबली परब, कल्पना पवार, ज्योती राणे, अनिता पंडित, सजनी परब, येसूबाई नाईक, रत्नप्रभा भाईप, जनाबाई सावळ, शशिकला पंडित, शालिनी परब, श्रीधर जाधव, रामचंद्र सावंत, विष्णू आसवेकर, शशिकांत परब, अंकिता वराडकर, छाया परब, ललिता नाईक, शिवराम पंडित या माजी विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार उदय रेडकर यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles