Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

प्रेरणादायी – नीता राऊळ यांना कोल्हापूरचा महाराष्ट्र लोककला पुरस्कार जाहीर! ; कोल्हापूर येथे २९ डिसेबरला पुरस्काराचे वितरण.

कुडाळ : कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. नीता राऊळ यांना कला, साहित्य, समाज, शिक्षण, अध्यात्म, संस्कृती, उद्योग, महिला, पर्यावरण, व युवक अशा विविध क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या त्यांच्या आर्दश व भरीव योगदानाबददल कोल्हापूरचा महाराष्ट्र लोककला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कोल्हापूर येथे रविवार दिनांक २९ डिसेबर रोजी आई महालक्ष्मी संमेलनात चित्रपट अभिनेते संजय खापरे व उद्योजीका पुनम मोरे यांच्या हस्ते सन्मानीत केले जाणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व निमत्रंक डॉ. बी. एन. खरात व स्वप्नपुर्ती फाउडेशनचे मोहन गोखले यांनी दिली. समुध्दी प्रकाशन, स्वप्नपुर्ती फाउडेशन, जिदद फाउंडेशन, वेद फाउंडेशन, स्वामी इंटरप्रायजेसच्या संयुक्त विद्यमाने शाहु स्मारक भवन दसरा बौक येथे आई महालक्ष्मी संमेलन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळयात विविध क्षेत्रात पुरोगामी विचाराने निस्वार्थ कार्य करणाऱ्याचा सन्मान होणार आहे.

सामाजीक, सांस्कृतीक, धार्मीक क्षेत्रामध्ये पारंपारीक लोकसंस्कृतीचे सर्वधन, संगोपन प्रचार आणी प्रसार करण्याचे महत्वपुर्ण कार्य गेल्या दोन दशकापासुन सौ नीता राऊळ या करीत आहेत. सौ नीता राऊळ या मुळगाव कुडाळ ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथिल रहिवाशी असुन आपली कौटुंबीक जबाबदारी आणी गारमेंट व्यवसाय साभांळत फुगडी या लोककलेच्या माध्यमातुन एक यशस्वी महिला म्हणुन आपले नाव कमावले आहे. फुगडी हि एक महाराष्ट्र व गोवा राज्यातील पारंपारीक लोककला आहे. महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पांरपारीक लोकनृत्यामध्ये याची गणना होते. आजच्या मोबाईलच्या युगात फुगडी ही लोककलाही काळाच्या ओघात लृप्त होत चालली होती. मात्र सौ. नीता राऊळ यानी या लोप पावत चाललेल्या लोककलेला लोकआक्षय मिळवुन देण्यात सिंहाचा वाटा उचलेला आहे. त्यांनी आपले तन मन धन अर्पण करून अनेक अडचणीवर मात करीत श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ या नावाने फुगडी मंडळ स्थापन केले. फुगडी या पारंपारीक लोककलेला आधुनिकतेची जोड देत कोकणातचे नव्हे तर मुबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे तसेच गोवा राज्य या ठीकाणी फुगडी या लोककलेचे अनेक कार्यक्रम करून या लोककलेचा प्रचाार आणी प्रसार केलेला आहे. सन २०१४ मध्ये झीटीव्ही आयोजीत मंगळागौर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीत तर २०१५ मध्ये साम टीव्ही आयोजीत फुगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित संपुर्ण महाराष्ट्रचे लक्ष आपल्याकडे वेधले. तसेच राज्यभर वेगवेगळया ठीकाणी झालेल्या एकुण १७७ फुगडी स्पर्धेत सहभागी होवुन १५७ ठीकाणी प्रथम क्रंमाक मिळवलेला आहे. तसेच आजपर्यंत जवळजवळ फुगडी या लोककलेचे जवळजवळ २४०० स्टेजशो सादर करण्याचा विक्रम त्यानी केलेला आहे. आपल्या फुगडी या लोकलेच्या माध्यमातुन स्त्रीभुण हत्या, प्लास्टीक बंदी या विषयावर सामाजीक प्रबोधन करीत आहेत. त्याच्या या कार्याची दखल आणी आदर्श घेत सिधुंदुर्गामध्ये अनेक फुगडी मंडळे उदयास आलेली आहेत. त्यामुळे अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे.

कोकणची संस्कृती, पांरपारीक लोककला सर्वधन आणी संगोपन, करण्याच्या त्यांच्या या सामाजीक कार्याची दखल घेत त्यांना कोल्हापूरचा महाराष्ट्र लोककला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबददल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles