Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

‘आरपीडी’च्या ‘लोकगंध’ वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरणाला आजपासून सुरुवात.! ; दिग्गज मान्यवरांची लाभणार उपस्थिती.

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी यांच्या ‘लोकगंध’ या वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात आजपासून होत आहे. दिनांक 27 व 28 डिसेंबर 2024 या दोन दिवसात विविध रंगारंग कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यात आज दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन दुपारी दोन वाजता होणार आहे. तसेच हास्य, विनोद आणि व्यक्तिमत्त्वाची महती सांगणारा ‘शेलापागोटे’ हा कार्यक्रम दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी तर विविध गुणदर्शन कार्यक्रम दुपारी 3 वाजता संपन्न होणार आहे.

तसेच स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उद्या शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सावंतवाडीचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीधर पाटील उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत हे असणार आहेत. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समितीचे अध्यक्ष अमोल सावंत तसेच सर्व संचालक मंडळ यांची उपस्थिती लाभणार आहे.

तरी या दोन दिवसाच्या कार्यक्रमाचा शिक्षणप्रेमी, विद्यार्थी तसेच पालक वर्ग यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापिका श्रीमती संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक संजय पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वनिता घोरपडे, मानसी नागवेकर, विद्यार्थी प्रतिनिधी भावेश सापळे, पूजा राठोड, सांस्कृतिक प्रमुख ओंकार चव्हाण, मुख्यमंत्री शुभम वरक, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रांजली कबरे, सांस्कृतिक प्रमुख भक्त रजपूत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles