Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कधीच होणार नाही सर्पदंश, फक्त ‘ही’ वस्तू खिशात ठेवा.!

पुणे : साप म्हटलं की भल्या-भल्याची भीतीनं गाळण उडते, अंगावर काटा उभा राहतो. साप चावल्यानंतर अनेक व्यक्तींचा भीतीमुळेच मृत्यू होतो. साप चावल्याची भीती त्याच्या मनात असते. भारतात सापाबाबत अनेक गैरसमज आहेत, या गैरमजामुळेच अनेकदा सापांना मारलं जातं. त्यामुळे भारतातील सापांच्या अनेक दुर्मिळ जाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

साप हा विषारीच असतो, मग तो कोणत्याही जातीचा असू दे हा सर्वात मोठा गैरसमज आहे. त्यामुळे आपण दिसला साप की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो मात्र तसं न करता सर्पमित्राला त्याबाबत माहिती देणं गरजेचं असतं. भारतामध्ये सापाच्या ज्या जाती आढळतात त्यात प्रामुख्यानं चार जातीच या विषारी आहेत, ज्यामध्ये कोब्रा अर्थात नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार या सापांचा समावेश होतो. या जातीचे साप महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात आढळतात.

या चार जाती सोडल्या तर भारतात जे पण साप आढळतात त्यातील बहुतांश जाती या बिनविषारी आहेत. साप विषारी असो अथवा बिनविषारी जर साप चावल्यानंतर संबंधित व्यक्तीला योग्य उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे साप चावल्यास त्या व्यक्तीला तातडीनं डॉक्टरकडे नेणं आवश्यक असते.

मात्र अशा काही वनस्पती आहेत, ज्या वनस्पतीच्या वासामुळे साप घराकडे फिरकत देखील नाहीत, अशाच एका वनस्पतीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. ही वनस्पती तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊ शकते.

सर्पगंधा असं या वनस्पतीचं नाव आहे. या वनस्पतीला तीव्र असा वास असतो. त्यामुळे ही वनस्पती जर तुमच्या घरात लावलेली असेल तर साप तिकडे फिरकत देखील नाही. दरम्यान या वनस्पतीची मुळे जर तुम्ही तुमच्या खिशात ठेवली तर साप तुमच्या जवळही येणार नाही.

(सूचना : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles