Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजपेक्षा वाईट स्थिती.! ; पाचव्यांदा ‘असं’ काही घडलं.

सिडनी : कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड मालिकेपूर्वी भारताचा दबदबा होता. पण न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया मालिकेत भारताची पुरती वाट लागली आहे. न्यूझीलंडने भारतात येऊन व्हाईट वॉश दिल्याची प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. तर ऑस्ट्रेलियातही टीम इंडियाची सुमार कामगिरी राहिली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी दोनदा गाठणाऱ्या टीम इंडियाच्या वाटेला असं अपयश आलं आहे. टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाला ग्रहण लागल्यासारखं वाटत आहे. कोणतीच बाब टीम इंडियाच्या पथ्यावर पडताना दिसत नाही. वनडे मालिकेतही श्रीलंकेने दारूण पराभव केला होता. असं असताना कसोटीत टीम इंडियाच्या नावावर एक नकोसा विक्रम रचला गेला आहे. टीम इंडिया 2023 नंतर एका नकोशा विक्रमासह टॉपवर आहे. टीम इंडिया बॉर्डर – गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनीत खेळत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी घेतली. कौल जिंकला आणि टीम इंडियाने एका नकोशा विक्रमला गवसणी घातली.

टीम इंडिया पहिल्या डावात पहिल्याच दिवशी 185 धावांवर बाद झाली. 2023 नंतर ही पाचवी वेळ जेव्हा टीम इंडिया 200 धावांचा आत बाद झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजीवर बोट ठेवलं जात आहे. या उलट गोलंदाजीत टीम इंडिया चांगली कामगिरी करत असल्याचं दिसत आहे. 2023 या वर्षानंतर कसोटीतील पहिल्या डावात 200 आत बाद होण्याचा विक्रम आता भारताच्या माथ्यावर कोरला गेला आहे. भारताने 5 वेळा, वेस्ट इंडिज 3 वेळा, अफगाणिस्तान 3 वेळा, बांग्लादेश 3 वेळा आणि दक्षिण अफ्रिका 3 वेळा बाद झाली आहे.

दरम्यान, सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 9 धावांवर 1 गडी गमवला आहे. दुसऱ्या दिवशी इतर खेळाडूंना झटपट बाद करण्याचं आव्हान आहे. जर ऑस्ट्रेलियाने 185 धावांची मजल ओलांडली आणि 100 हून अधिक धावांची आघाडी घेतली तर टीम इंडियाला विजय मिळवणं कठीण जाणार आहे. जर टीम इंडियाचा पराभव झाला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी आणि मालिका देखील गमवावी लागणार आहे.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles