सावंतवाडी : नेहमीचं सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अर्चना घारे – परब यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागाच्या अध्यक्ष पदी अर्चना घारे – परब यांची फेर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी अर्चना घारे – परब यांना आज नियुक्ती पत्र प्रदान करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

आगामी काळात आपण पक्षाची ध्येय धोरणे योग्य पद्धतीने वापरून जनतेच्या न्याय हक्कासाठी कार्य करू, असा विश्वास अर्चना घारे यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंतवाडी विधानसभा निवडणूकीत अर्चना घारे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. मात्र पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.


