कुडाळ : स्वतःचा उद्योग असूनही त्यात चाकोरीबद्ध नोकरी केल्याची मानसिकता निर्माण होणे,मार्केटींग व नेटवर्किंगच्या समस्या, आपण आपल्या उद्योगाबाबत रंगवलेली स्वप्न आणि अपेक्षा, उद्योगात यशस्वी व्हायचे असेल व त्याचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी आताच्या गतिमान तंत्रज्ञानाच्या युगात मार्गदर्शन महत्त्वाचे आहे म्हणूनचं कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा फळप्रक्रिया उत्पादक संघ व कऱ्हाडे ब्राह्मण ब्रेन डेव्हलपमेंट फाऊंडेशन या तिन्ही संस्थाच्या वतीने गुरूवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत कुडाळ औद्योगिक वसाहतीतील असोसिएशनच्या संकुलात बिझनेस सिस्टीम इम्प्लिमेंटेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यशाळेत आय्. लीड कंन्संल्टिग अॅन्ड ट्रेनिंग, मुंबईचे तज्ज्ञ श्री विनोद मेस्ञी व श्री अतिश कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. ज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल त्यानी https://tinyurl.com/SystemKudal या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी.
तरी बहुसंख्य उद्योजकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ एम् आय् डि सी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, सिंधुदुर्ग जिल्हा फळप्रक्रिया उत्पादक संघाचे श्री श्रीधर ओगले, कऱ्हाडे ब्राह्मण ब्रेन डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे श्री विहंग देवस्थळी यांनी केले आहे.
उद्योजकांसाठी बिझनेस सिस्टीम इम्प्लिमेंटेशन कार्यशाळेचे कुडाळ येथे ३० रोजी आयोजन!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


