मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. आरोपींनी एका बाजूला हत्या करण्यामागच कारण सांगितलं आहे, त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीने मुंबई पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये एका डायरीचा खुलासा केला आहे. यात बिल्डर आणि नेत्यांची नाव आहेत. झिशानने आपल्या स्टेटमेंटमध्ये बिश्नोई गँगचा उल्लेख केलेला नाही. पोलिसांनी 4500 पानी आरोपपत्र दाखल केलय. यात 26 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. अनमोल बिश्नोईला फरार आरोपी ठरवलं आहे. झिशान सिद्दीकी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांची नाव घेतली आहेत.
या हत्या प्रकरणात SRA अँगलने तपास व्हावा, असा झिशान सिद्दीकी यांचा प्रयत्न आहे. त्यांनी काही मोठे बिल्डर आणि विकासकांची नाव घेतली आहेत. अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते. बाबा सिद्दीकी हे डायरी लिहायचे. हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान व्हॉट्स अॅपवरुन त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं.


