कणकवली : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली येथील हळकुळ बुद्रुक येथे आयोजित संविधान चषक 2025 सन्मान संविधानाचा या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा मानकरी सावंतवाडी येथील ब्लू स्टार स्पोर्ट क्लब ठरला आहे. या स्पर्धेचे आयोजन 23 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान कणकवली हळकुळ बुद्रुक येथील मैदानावर करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 16 संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यात सावंतवाडी येथील ब्लू स्टार स्पोर्ट क्लब यांनी चमकदार कामगिरी करत या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा मानकरी होण्याचा मान पटकावला आहे. या संघाचा अष्टपैलू खेळाडू निखिल कांबळे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सर्धेतील उत्कृष्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिस्पर्धी संघ शांतीदूत कणकवली या संघानी देखील शेवटच्या चेंडू पर्यंत कडवी झुंज दिल्याचे पहायला मिळाले. या स्पर्धेत विजेत्या संघाकडून निखिल कांबळे, प्रशांत पाटणकर, लवलेश कांबळे, यश नाईक, प्रसाद वाडकर, दुर्गेश खोब्रागडे यांनी चांगली कामगिरी करत संघाला विजयी करण्यात मौलाचा वाटा उचलला. तर इतर खेळाडूंनी देखील उत्तम अशी साथ दिली.
सावंतवाडीचा ब्लू स्टार स्पोर्ट्स क्लब संविधान चषक – २०२५ चा मानकरी!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


