सावंतवाडी : शिवप्रेमी मित्रमंडळ आजगांव – धाकोरे च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी जि. प. केंद्रशाळा आजगांव नं. १ शाळेत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा इ. १ ते ४ आणि ५ ते ७ या दोन गटात घेण्यात आली. जिल्ह्याभरातील जवळपास ८० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते बक्षिसे देण्यात आली.
दीपप्रज्वलन आणि श्रीदेवी सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी केंद्रशाळा मुख्याध्यापक ममता जाधव, माजी विद्यार्थी संघ सचिव विलासानंद मठकर, अनंत (बाळू) पांढरे, बाळकृष्ण हळदणकर, चंदन गोसावी सर, विजय ठाकर सर, पालक नाणोसकर, पत्रकार मदन मुरकर अनिल गोवेकर सर, पदमनाभ पांढरे , कल्पना केदार मॅडम, गौरी आरोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेतील गुणानुक्रमे क्रमांक पुढील प्रमाणे:-
*लहान गट – (इ.१ ते ४ )*
१) अनुप्रिया अजित राणे – (सावंतवाडी नं. ४) – प्रथम क्रमांक
२) वेदा मंदार शेटकर – (सेंट झेवियर इंग्लिश मेडियम स्कूल आजगांव ) – द्वितीय क्रमांक
३) समर्थ सागर पाटील – ( बांदा नं. १ ) – तृतीय क्रमांक
४) प्रार्थना प्रणय नाईक – (स्टेफिंग स्टोन ) – उत्तेजनार्थ १
५) वैदेही वैभव जाधव – (जि.प.प्राथ. शाळा आजगांव भोमवाडी ) – उत्तेजनार्थ – २
६) पवित्रा अमित कदम – ( शिरोडा नं. १ ) – उत्तेजनार्थ -३
*मोठा गट (इ. ५ ते ७ वी )*
१) अनुराग विजय ठाकर – कळसुलकर इअंग्लिश स्कूल – प्रथम क्रमांक
२) वर्षा भिकाजी नाईक -जनता विद्यालय तळवडे – द्वितीय क्रमांक
३) वेदा दत्तगुरु कांबळी – मळगांव इंग्लिश स्कूल आजगांव – तृतीय क्रमांक
४) साहिल उत्तम भागित – आजगांव नं. १ – उत्तेजनार्थ १
५) हर्षित चिन्मय जाधव – कोलागंव नं. १ – उत्तेजनार्थ २
६) मयुरी गुरुनाथ पाटील – इन्सुली हायस्कूल – उत्तेजनार्थ ३
मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थी, पालक यांच्यासाठी स्पर्धा संपल्यावर भोजनाची व्यवस्था मंडळाने केली.
स्पर्धेचे परीक्षण अक्षय सावंत सर आणि सत्यम मल्हार सर यांनी केले. स्पर्धेचे नियोजन आणि सुत्रसंचलन दत्तगुरु कांबळी सर यांनी केले.
संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनिल गोवेकर सर, बाळू पांढरे, बाळकृष्ण हळदणकर,
भाऊ रेवाडकर, प्रसाद मेस्त्री, प्रतिक भगत, संकेत वाडकर, गुरुनाथ गावंडे, साईश वाडकर, अंकित आजगांवकर, मंदार आजगांवकर, जयेश कानकोणकर, नितीन मुळीक, तेजस तेली, रामदास परब , सदाशिव तिरोडकर, अक्षय पांढरे, प्रविण मुळीक, प्रशांत काकतकर, अमोल गोवेकर, उत्तम सातोसकर, शाळेच्या माजी शिक्षिका रुपाली नाईक मॅडम, राजू शेणई , अक्षता वाडकर, प्रणव मेस्त्री, आणि शाळेचे इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्याचे सहकार्य तसेच मंडळाचे अनेक कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेऊन खूप मोठे योगदान दिले.
ADVT –