बांदा : छत्रपती शिवराय हे महान योद्धा असण्याबरोबरच स्वराज्याचे संस्थापक, तसेच सुजाण प्रशासक व द्रष्टे राष्ट्रनिर्माता होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर समस्त भारतवर्षाच्या इतिहासात शिवरायांचे जीवन देदिप्यमान व अनन्यसाधारण ठरणारे आहे. एका आदर्श प्रशासकाला आवश्यक असणारे शिस्त, जोखीम स्वीकारण्याचे धाडस, न्याय, दूरदृष्टी, विवेक, अखंड परिश्रम हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते. छत्रपती शिवरायांचा हा वारसा शिवविचार जपणाऱ्या श्री स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा, असे आवाहन बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी येथे केले.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील पीएमश्री केंद्रशाळा नं. १ च्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात श्री. बडवे बोलत होते. याठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, माजी उपसरपंच बाळु सावंत, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सीताराम गावडे, बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, मुख्याध्यापक शांताराम असनकर, गणेश गर्दे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त उपक्रमशील शिक्षक जे. डी. पाटील व नवनिर्वाचित उपसरपंच आबा धारगळकर यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी पारंपारीक पद्धतीने व पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. संस्थेच्या वतीने गेल्या आठ दिवसात शालेय, महाविद्यालयीन गटात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, राधिका गवस, संचिता कुबडे, परीक्षक पंकज टिळवे, गौरी बांदेकर आदी उपस्थित होते.
(फोटो :- श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विविध स्पर्धामधील विजेत्या मुलांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.)
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.
रंगभरण व चित्रकला स्पर्धा (प्रथम तीन क्रमांकानुसार). अंगणवाडी ते पहिली गट- दिव्यता वनसिह पाडवी, रुद्राणी यशवंत पंडित, मंथन बाळा शेर्लेकर.दुसरी ते चौथी गट – विहान अरुण गवस, शरण्या संदीप वायंगणकर, सहयू सुरज राऊळ. पाचवी ते सातवी गट- श्रेया भास्कर राठोड, तनिष्का संदीप देसाई, काव्या सूर्यकांत चव्हाण. आठवी ते दहावी गट – दर्शन सुनील परब, अधिराज हंसराज गवळे.
वेशभूषा स्पर्धा- अंगणवाडी गट- विधी विनोद अष्टेकर, साईरा शैलेश लाड, राज गुरुराज कणबर्गी. पहिली ते तिसरी गट – सार्थक घनश्याम वालावलकर, हर्ष विश्राम ठाकर, राशी ज्ञानेश्वर दळवी. चौथी ते सहावी गट -पार्थ उमेश सावंत, परिधी प्रसाद वायंगणकर, सिपिका गोपाळ परब. सातवी ते दहावी गट – नैतिक निलेश मोरजकर, कृष्णाई ज्ञानेश्वर महाले, दिक्षा शामसुंदर वरक.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रीना मोरजकर व जे डी पाटील यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रकाश तेंडोलकर, प्रा. वैभव खानोलकर, शुभेच्छा सावंत यांनी केले. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण गौरी बांदेकर व पंकज टिळवे यांनी केले. पोवाडा स्पर्धेचे परीक्षण हेमंत गवस यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार संकेत वेंगुर्लेकर, भूषण सावंत, नारायण बांदेकर, शुभम बांदेकर, अनुप बांदेकर, ओंकार हळदणकर, कांता हळदणकर, सूर्यकांत चव्हाण, प्रथमेश राणे, अक्षय मयेकर ,प्रशांत गवस, तात्या स्वार, मंदार सावंत, सौ. गौरी बांदेकर, सौ. रीना मोरजकर, वेदिका गावडे, सौ. स्वाती पाटील आदी उपस्थित होते.
ADVT –