सिंधुदुर्गनगरी : शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्गतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांचे जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे सचिव दिनेश म्हाडगुत, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड, जिल्हा पदाधिकारी संजय पेंडुरकर, महेंद्र वारंग, शाम वारंग, शैलेश मुळीक, भूषण गावडे, बाळकृष्ण कदम व इतर पदाधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

तसेच नूतन कणकवली तालुका क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांचेही स्वागत कणकवली तालुका क्रीडा समन्वयक तथा राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपरोक्त सर्व पदाधिकारी व रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.

दरम्यान प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालयाचे मावळते जिल्हा क्रीडा अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी जिल्ह्यात केलेल्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्याबद्दल शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गा च्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हा सचिव दिनेश म्हाडगुत व बयाजी बुराण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या सेवेसाठी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.



