सावंतवाडी: राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासवादी विचारांची प्रेरणा, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाची दिशा आणि सिंधुदुर्गचे लाडके पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा असा धडाका उडविला आहे की, त्याची दखल आता संपूर्ण कोकण घेत आहे.* कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, निवडणुकीचे गणित नाही, प्रसिद्धीचा हव्यास नाही, केवळ *”जनसेवा हाच धर्म आणि कोकणचा विकास हाच संकल्प”* या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी उभारलेले कार्य आज इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे.
आजच्या राजकारणात अनेकांचे समाजाशी नाते हे निवडणुकांपुरतेच मर्यादित राहिलेले दिसते.
निवडणूक आली की आश्वासनांचा वर्षाव होतो, जनतेच्या दारात गर्दी होते आणि निवडणूक संपली की अनेक चेहरे गायब होतात. मात्र या साऱ्या प्रवाहाला छेद देत विशाल परब यांनी स्वतःची स्वतंत्र आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. निवडणूक असो वा नसो, दिवस असो वा रात्र, पाऊस असो वा संकट; जनतेच्या मदतीसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आज प्रत्येक घराघरात निर्माण झाली आहे.
सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांतील दुर्गम भागांमध्ये जिथे अनेकदा प्रशासन पोहोचण्यासही अडचणी येतात, अशा वाडी-वस्त्यांमधील शाळांपर्यंत स्वतः पोहोचून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम विशाल परब यांनी केले. तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करून त्यांनी शिक्षणाच्या प्रवासाला नवी ऊर्जा दिली. शेवटच्या गावातील, शेवटच्या शाळेतील आणि शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा त्यांचा संकल्प केवळ कौतुकास्पद नाही, तर समाजकारणाचा आदर्श ठरला आहे.
याचबरोबर पावसाळ्यात उदरनिर्वाहासाठी झटणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची अडचण ओळखून त्यांना मोठ्या व्यावसायिक छत्र्यांचे वाटप करण्यात आले. ही मदत केवळ वस्तूंचे वितरण नव्हते, तर त्यांच्या व्यवसायाला आधार देणारी, त्यांच्या संघर्षात सहभागी होणारी सामाजिक बांधिलकी होती. समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यावर संवेदनशीलपणे उपाय करण्याची विशाल परब यांची कार्यपद्धती त्यांना इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देते.
विशाल परब यांच्या कार्यामागे प्रसिद्धीचा गाजावाजा नाही, तर कृतीची ताकद आहे. कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा न ठेवता, समाजासाठी सातत्याने झटणारे हे व्यक्तिमत्त्व आज असंख्य युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आहे. त्यांच्या कार्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्य अधिक व्यापक स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचले असून, सामान्य नागरिकांच्या मनात विश्वासाचे नवे नाते निर्माण झाले आहे.
आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एखाद्या कुटुंबावर संकट आले, एखाद्या विद्यार्थ्याला मदतीची गरज भासली, एखाद्या शेतकऱ्याची समस्या निर्माण झाली किंवा एखादा लघु व्यावसायिक अडचणीत सापडला, तर सर्वप्रथम आठवण होते ती विशाल परब या नावाची. कारण त्यांनी केवळ राजकारण केले नाही, तर माणसं जोडली, विश्वास जिंकला आणि जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले.
त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यांची लोकप्रियता वाढत असताना त्यांच्या स्वभावातील साधेपणा, विनम्रता, शांतपणा आणि संयम हे गुण तितक्याच ठळकपणे जाणवतात. जमिनीवर पाय घट्ट रोवून आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता असलेले हे नेतृत्व आज कोकणातील युवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.
सामाजिक कार्य, विकासाची तळमळ, जनतेप्रती असलेली आत्मीयता आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाण्याची वृत्ती यामुळे विशाल प्रभाकर परब हे नाव आज सावंतवाडी मतदारसंघापुरते मर्यादित राहिलेले नाही; तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विश्वास, विकास आणि सेवाभावाचे प्रतीक बनले आहे.
जनतेसाठी झटणारे नेतृत्व पदामुळे मोठे होत नाही; तर जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासामुळे मोठे होते. आणि म्हणूनच आज कोकणातील हजारो कुटुंबांच्या ओठांवर अभिमानाने उच्चारले जाणारे नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते, जनतेचे हक्काचे माणूस, विशाल प्रभाकर परब!



