सावंतवाडीत ‘द्रिशा क्रिएशन साडी अँड मॅचिंग सेंटर’चे दिमाखदार उद्घाटन! ; वेत्येचे युवा सरपंच गुणाजी गावडे यांच्या हस्ते शानदार शुभारंभ! ; युवा उद्योजक उमेश पावसकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

✍️ साबाजी परब.

  • सावंतवाडीकरांसाठी फॅशन, गुणवत्ता आणि विश्वासाचा नवा संगम; अत्याधुनिक साड्यांचे आकर्षक दालन ग्राहकांच्या सेवेत.

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील महिलांसाठी फॅशन, गुणवत्ता आणि आकर्षक वैविध्याचा नवा अध्याय सुरू करत युवा उद्योजक उमेश पावसकर यांनी दुकान क्रमांक १६, दुर्वांकुर कॉम्प्लेक्स, विठ्ठल मंदिर रोड, सावंतवाडी येथे ‘द्रिशा क्रिएशन साडी अँड मॅचिंग सेंटर’ हे अत्याधुनिक साड्यांचे दालन ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे. या नव्या व्यावसायिक उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरण लाभले.

    

या भव्य दालनाचे उद्घाटन वेत्ये गावचे आदर्श युवा सरपंच गुणाजी गावडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी पावसकर व शेटकर कुटुंबीयांसह वेत्येचे माजी सरपंच नरेंद्र मिठबावकर, सुनील गावडे, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी युवा उद्योजक उमेश पावसकर यांच्या धाडसी व्यावसायिक वाटचालीचे कौतुक करत त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला.

‘द्रिशा क्रिएशन साडी अँड मॅचिंग सेंटर’मध्ये आधुनिक ट्रेंडनुसार विविध डिझाईन्सच्या आकर्षक साड्या, मॅचिंग साहित्य, दर्जेदार कलेक्शन आणि ग्राहकाभिमुख सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडी आणि परिसरातील महिलांसाठी हे दालन निश्चितच आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

यावेळी सरपंच गुणाजी गावडे यांनी युवा उद्योजक उमेश पावसकर यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, स्थानिक तरुणांनी रोजगारनिर्मितीच्या दिशेने असेच नवे उद्योग उभारावेत, असे मत व्यक्त केले. तसेच संचालक उमेश पावसकर यांनी ग्राहकांना उत्कृष्ट गुणवत्ता, वाजवी दर आणि समाधानकारक सेवा देण्याची ग्वाही देत, सावंतवाडीकरांनी ‘द्रिशा क्रिएशन साडी अँड मॅचिंग सेंटर’च्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

स्थानिक उद्योजकतेला नवी झेप देणारा हा उपक्रम सावंतवाडीच्या व्यापारी क्षेत्रात निश्चितच एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles