खळबळजनक – माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपींवर शिस्तभंगाची कारवाई! ; विनायक पाटील यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्रशासनाने कडक भूमिका घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. कविता शिंपी यांना थेट कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने ही कार्यमुक्त ची कारवाई केली आहे.पूर्वपरवानगी न घेता वैद्यकीय रजेवर गेल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असून, प्रशासनातील शिस्त न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना हा इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी तसे आदेश जारी केले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार, कविता शिंपी या २५ मार्च २०२६ पासून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वैद्यकीय कारणावरून रजेवर गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या पदाचा कार्यभार तत्काळ श्री. विनायक पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती देवगड यांच्याकडे अतिरिक्त स्वरूपात सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्या रजेवरून परत आल्यावरही कार्यभार परत दिला जाणार नाही, असे स्पष्टपणे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शिंपी यांनी वैद्यकीय रजा पूर्ण करून २७ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा पदावर रुजू झाल्याचा अहवाल सादर केला. मात्र, त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना लगेचच एकतर्फी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे त्या रुजू होताच त्यांना पदाचा कार्यभार मिळण्याऐवजी थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
या प्रकरणात पुढील आदेश येईपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. विनायक पाटील यांच्याकडेच कायम ठेवण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला असून, या निर्णयामुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles