सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून प्रथमेश राजन तेली व सर्वेश राजन तेली यांना आंबा बागायती सह जमीन खरेदीसाठी सन २०२१ मध्ये ९.६०कोटीचे बारा वर्षे मुदतीने कर्ज मंजूर करण्यात आले होते.कर्जाला २ वर्षे सवलीतीचा कालावधी देण्यात आला होता. कर्जासाठी जामीनदार म्हणून राजन कृष्णा तेली,रुजिता राजन तेली,सच्चिदानंद जगन्नाथ परब,लालन सुशील आळवे वसुशिल दिनकर आळवे यांना घेण्यात आले होते.कर्जासाठी बँकेने कर्जदार खरेदी करत असलेली जमीन व तेली कुटुंबियांचे कणकवली येथील व्यापारी गाळे तारण घेतले होते सर्वेश राजन तेली यांनी कर्जाचे नियमित व्याज व हप्ता भरणे करणे आवश्यक होते परंतु कर्ज उचलीपासून कर्जदार यांनी कर्जाच्या रक्कमा भरणा करण्यास टाळाटाळ केल्याने हे कर्ज दि.३१/ ३/२०२४रोजी थकित होऊन रुपये ११.७९कोटी ने एनपीए वर्गवारीत गेले आहे. कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने वारंवार पाठपुरावा करून देखील तेली कुटुंबीयांनी सदरची रक्कम भरण्यास असमर्थता दाखवली त्यामुळे बँकेने तेली कुटुंबिय व जामीनदार यांच्यावर मे. सहकार न्यायालय क्रमांक २ कोल्हापूर येथे ९५(४)खाली सहकार कायद्यान्वये सी.सी. के.नं. ५७९/२०२४ ने थकीत कर्ज रक्कम रुपये ११.७९ कोटी व त्यावर होणारे व्याज यासाठी लवाद दावा व अव्वल जप्ती कर्ज दाखल केला होता या अव्वल जप्ती अर्जावर सुनावणी होऊन आज दिनांक ०४/०१/२०५ रोजी न्यायालयाने बँकेच्या बाजूने निर्णय देत तेली कुटुंबियांच्या मालमत्ता हस्तांतरित करण्यास व त्यावर अन्य कोणताही बोजा चढवण्यास व अन्य मार्गाने मालमत्तेची विल्हेवाट लावण्यास मनाई मनाई आदेश दिला आहे. कर्जास तारण दिलेली मिळकत गाव मौजे गिरप वाडा,उभा दांडा व कालवी ता. वेंगुर्ला, गाव मौजे कणकवली नगरपालिका हद्दीतील मालमत्ता, गाव मौजे बिडवाडी ता.कणकवली,घोडगे ता. कुडाळ बिडवाडी ता. कणकवली,भरणी, घोटगे,नारूर ता. कुडाळ, गावपाली बु.जि. रायगड, हरकुळ बुद्रुक ता.कणकवली मिठबांव ता. देवगड गाव मौजे सावंतवाडी-सावंतवाडी शहर, जानवली ता.कणकवली या गावामधील कोर्ट नोटीसमध्ये नमुद केलेले सर्वे नंबर मधील स्थावर मालमत्ता तेली कुटुंबीयांना कर्ज पूर्ण फेड होईपर्यंत हस्तांतरित करण्यास व त्यावर बोजा निर्माण करण्यास व त्याची अन्यप्रकारे विल्हेवाट लावण्यास मे.न्यायालयाने मनाई आदेश देण्यात आला आहे. बँकेने कर्ज दिल्यानंतर त्याची पुनश्च छाननी केली असता प्रथमेश राजन तेली,सर्वेश राजन तेली यांनी बँकेची दिशाभूल करून ज्यादा रकमेचे कर्ज उचल केल्याचे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे तसेच कर्जदार यांनी वेळोवेळी बँकेत कर्ज भरणा करत असल्याचे सांगून काही तारण मालमत्तेवरील (दुकान काळे) बोजा कमी करून सदर सदरच्या मालमत्ता विक्री केल्या असून त्या विक्रीतून जमा झालेल्या रकमा बँकेत भरणा न करता परस्पर विल्हेवाट लावली एकंदरीतच प्रथमेश राजन तेली,सर्वेश राजन तेली यांनी बँकेला हेतुपुरस्कर फसवण्याचा प्रयत्न केल्याचे मा.न्यायालयाचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे मा. सहकार न्यायालय क्रं.२ कोल्हापूर यांनी सदरचा आदेश जारी केला असून त्याची अंमलबजावणी लागू करण्यात आली आहे.या कारवाईमुळे अधिकाराचा गैरवापर करत बँकेची फसवणूक करणा-यांवर वचक निर्माण होणार आहे.सदर दाव्या प्रकरणी बँकेचे वकील अँड. अमोल पाटील कोल्हापूर यांनी कामकाज पाहिले.