सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे आयोजित ‘ज्ञान साधना गौरव सोहळा २०२६’ मध्ये सावंतवाडी तालुक्यातील आदर्श शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल ज्ञान साधना व विज्ञान भास्कर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा आणि शिक्षकांच्या अविरत सेवेचा सन्मान करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा –
सावंतवाडी तालुक्यातील खालील शिक्षकांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत हा बहुमान पटकावला आहे:
श्री. राजेंद्र पाय सावंतभोसले (न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा)
श्री. धनराज कृष्णा सजगुरे (कलंबिस्त हायस्कूल,कलंबिस्त )
श्री. रोहिदास ठकाजी केंगले (श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव)
श्री. दशरथ रामकृष्ण शृंगारे (राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी)
सौ. प्रज्ञा मधुकर मातोंडकर (मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव), श्री सूर्यकांत अनंत सांगेलकर ( खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा) व आदर्श विज्ञान भास्कर पुरस्कार 2026 श्री संजय मधुकर शेवाळे (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली)
कार्यक्रमाचे स्वरूप –
हा गौरव सोहळा बुधवार, २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीच्या सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नरसु पाटील (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य टी.डी.एफ. संघटना) उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून सागर पाटील व वामन तर्फे यांची उपस्थिती लाभणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघांचे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे, सचिव विजय मयेकर, सहसचिव भाऊसाहेब चवरे आदि उपस्थित राहणार आहेत.
सावंतवाडी तालुका संघातर्फे अभिनंदन –
या निवडीबद्दल सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष दिगंबर मोर्ये, सचिव राहुल सामुद्रे, कार्याध्यक्ष विठ्ठल सावंत यांच्यासह सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संबंधित शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. “शिक्षकांच्या या सन्मानामुळे तालुक्याच्या शैक्षणिक वैभवात भर पडली आहे,” अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



