सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील मियासाहेब दर्ग्याजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत आयुषी देसाई हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेला कार्तिक परब याला तातडीने उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.



