मुंबई : देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत असून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू असल्याने हा उत्साह द्विगुणीत झाला आहे. सोशल मीडियावरीह महाशिवरात्रीचा आनंद भाविकांमध्ये दिसून येत असून नेटीझन्सकडून रिल्स व शिवमंदिराचे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शिवभक्तांकडून ‘देवा दी देव महादेव’ यांची पूजा अर्चना केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर स्वत: गाणं लिहिलं आहे. देवाधीदेव तू महादेव, तू तो सांब सदाशिव.. या शब्दांनी रचलेलं हे गीत मुख्यमंत्री यांनी युट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केलं आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांनी हे गीत गायलं आहे.
यंदाच्या महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर भगवान शिव यांच्या प्रेरणेतून गतवर्षी मी लिहिलेलं भगवान शिवशंकर यांच्या भक्तीरसाने भरलेलं हे गीत तुम्ही नक्की ऐका. ज्या गाण्याला संगीत आणि आपल्या स्वरांनी ज्यांनी गायलं ते शंकर महादेवन आणि माझी धर्मपत्नी अमृता फडणवीस यांनी. मला विश्वास आहे की, बाबा महादेव यांच्या सर्वच भक्तांना हे गीत ऐकून नक्कीच आनंद होईल. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा… असे ट्विट मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. तसेच, त्यांनी रचलेलं गीतही शेअर केलं आहे.
शिव सत्य आहे.. शिव सुंदर आहे… शिव अनंत आहे.. शिव ब्रम्ह आहे…शिव भक्ती आहे.. हिंदू धर्मात भगवान शंकराला आदिदेव म्हटले जाते. शिव, भोलेनाथ, आदिनाथ, महेश अशी अनेक नावे भगवान शंकराची आहेत. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर हे अत्यंत भोळे असून आपल्या भक्ताला ते वरदान देतात. अशा या भगवान शिवाचा सण म्हणजेच महाशिवरात्री.. या निमित्त देशभरात तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी देशभरात महाशिवरात्री साजरी होत आहे. या दिवसाची शिवभक्त आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी लोक उपवास करतात. तसेच, ते भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा विधीपूर्वक करतात.
ADVT –



