सावंतवाडी : नॅब आय हॅास्पिटल सावंतवाडी आणि ग्रामपंचायत निरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १ मार्च रोजी सकाळी १० ते २ या वेळेत मोफत नेत्र तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व सामान्यांना परवडेल अशा अल्प दरात मोतिबिंदचे ॲापरेशन केले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच सौ. सुहानी गावडे यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, गावासह पंचक्रोशीतील सर्व सामान्य लोकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना परवडेल अशा माफक दरात विविध शस्त्रक्रिया केली जाणार आहेत. हे शिबीर निरवडे ग्रामपंचायत कार्यालय निरवडे येथे होणार आहे.या शिबिरामध्ये चष्मांचे नंबर मोफत काढले जाणार आहेत तर आवश्यक असणारे गॅागल्स मोफत दिले जाणार आहेत या शिबिरामध्ये अल्पदरात चष्मे दिली जातील तर रेशनकार्ड धारकांना ॲापरेशन खर्चामध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे अशी या शिबिरामध्ये खास वैशिष्ट्ये आहेत.त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ. गावडे यांनी केले आहे.
ADVT –



