सावंतवाडी : आज दिनांक 3 मार्च रोजी ख्रिश्चन शांतता समिती सिंधुदुर्ग यांच्याद्वारे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये तब्बल 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ख्रिश्चन शांतता समितीतर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात व गरजूंना या समिती तर्फे मदतीचा हात देखील दिला जातो.
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याची जाणीव ठेवून आज ख्रिश्चन शांतता समिती हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला.
या उपक्रमात ख्रिश्चन बंधू – भगिनी तसेच शांतता समितीतील बंधू-भगिनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखिल अवधूते, टेक्निशियन प्राजक्ता रेडकर, प्रशांत सातार्डेकर, अनिकेत खाडे, मानसी बागेवाडी, त्यातच प्रमाणे सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समितीचे अध्यक्ष आनंद चौगुले व इतर पदाधिकारी दिलीप कांबळे श्री अँथोनी डिसोजा, ऑगस्टिन फर्नांडिस, श्री अतुल भोरे, श्री आशिष फर्नांडिस, श्री सिद्धेश साळस्कर, श्री मुर्गेश गौडर, सिताराम बांदोडकर, श्री. पीटर डिसोजा तसेच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम हे या उपक्रमात उपस्थित होते.


