Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

उद्याची रात्र वैऱ्याची…! ; डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जगभरात खळबळ.

वाशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्की यांना युक्रेन युद्ध थांबवावे अन्यथा तिसरे महायुद्ध सुरु होऊ शकते असा सल्ला दिला होता. त्यानंतर झेलेस्की यांनी पुतीन कशावरुन आमच्या देशावर आक्रमण करणार नाहीत ? त्याची गॅरंटी काय असा सवाल करीत तेथून काढता पाय घेतला होता. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर उद्याची रात्र मोठी असणार असे म्हटले आहे. या पोस्टनंतर जगभरात ट्रम्प नेमके काय करणार अशी भीती निर्माण झाली आहे. ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्की यांना टार्गेट करणार की रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी बैठक घेण्याचा नवा बॉम्ब टाकणार का ? याकडे जगभराचे लक्ष लागले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या पोस्टच्या आधीही एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी एकमात्र राष्ट्राध्यक्ष ज्याने युक्रेनची कोणतीही जमीन रशियाला दिली नाही.तो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आहे. लक्षात ठेवा जेव्हा कमजोर आणि अप्रभावी डेमोक्रेट टीका करतात. फेक न्यूज आनंदाने त्यांच्या प्रत्येक बातम्या देते !

यूक्रेन संदर्भात ट्रम्प घेणार मोठी बैठक –

ट्रम्प युक्रेनला मिळणारी अमेरिकन सैन्यांची मदत रद्द करणाऱ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ही बैठक गेल्या सरकारने आयोजित केली होती. ट्रम्प प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष युक्रेनसाठी नव्या पर्यायांवर विचार करणे आणि त्यावर एक्शन घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ याच्या सह अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत असे टदि न्यूयॉर्क टाईम्सटने म्हटले आहे.

मीटींगमध्ये ट्रम्प आणि झेलेस्की यांच्यातला वाद –

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्की यांच्या सोबत डोनाल्ड ट्रम्प यांची शुक्रवारी झालेली वादळी ठरली होती. संपूर्ण विश्वाने दोन देशांचे राष्ट्राध्यक्ष अशा प्रकारे लाईव्ह मिटींगमध्ये तावातावाने भांडताना प्रथमच पाहीले. अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ओव्हल ऑफीसमध्ये उभयतांमध्ये बैठक झाली होती. हा वाद झेलेस्की यांनी सामंजस्य करारावर सही करण्यास विरोध केल्याने झाला. झेलेस्की यांनी पुतीन यांच्यावर जोरदार टीका करीत बैठकीतून काढता पाय घेतला होता.या बैठकीनंतर आता ट्रम्प यांनी उद्याची रात्र मोठी असणार असे पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे.

झेलेस्की यांना ब्रिटनचे पंतप्रधान स्टॉर्मर यांचा पाठिंबा –

या उभय राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेल्या भांडणानंतर झेलेस्की यांच्या समर्थनात अनेक जागतिक नेते पुढे आले असून जग दोन भागात वाटले जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. यात ब्रिटनचे पंतप्रधान स्टॉर्मर यांनी झेलेस्की यांना पाठिंबा दिला आहे. लंडनमध्ये झेलेस्की आणि स्टॉर्मर यांची बैठक झाली. या बैठकीत स्टॉर्मर म्हणाले तुम्हाला रस्त्यांवरुन दिलेल्या घोषणाद्वारे ऐकले, तुम्हाला ब्रिटनचा संपूर्ण पाठींबा आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles