सावंतवाडी : शहरातील श्री विठ्ठल मंदिर, भटवाडी – सावंतवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल मंदिराचा १६ वा वार्षिक वर्धापन दिन उत्सव आज मंगळवार दि. ४ मार्च २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त खालीलप्रमाणे धार्मिक श्री विष्णू दत्तयाग व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
।। कार्यक्रम ।।
सकाळी ७ वा. – शांतीपाठ, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, आचार्यवरण
सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० – देवता आवाहन पूजन, होमहवनादी, सत्यदत्त श्री सत्यनारायण महापूजा
दुपारी १२.३० ते १ – आरती व तीर्थप्रसाद
दुपारी १ ते ३ – महाप्रसाद
दुपारी ३ वा. – भजन
सायं. ७ वा. – नित्य आरती व पालखी प्रदक्षिणा.
रात्रौ ९ वा. – श्री बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण
यांचा अध्यात्मिक, प्रबोधनपर, हृदयस्पर्शी,
विठ्ठल भक्तीवर आधारित दशावतार नाट्यप्रयोग
“भक्त पुंडलिक”
तरी सर्व भक्तजनांनी वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट, भटवाडी-सावंतवाडी यांनी केले आहे.
ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


