मुंबई : बीडमधील मस्सोजगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण चांगलचं तापलं असून या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील सातत्याने केली जात होती. आता फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांना लाथ मारून बाहेर काढावं अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती.


