Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

‘एनिमी ऑफ अमेरिका’वर युरोपीय देशात होणार चर्चा.! ; बल्गेरियामध्ये पुस्तकावर चर्चेचे आयोजन, अनिल सरमळकर राहणार उपस्थित.

सावंतवाडी : अपेक्षेप्रमाणेच ‘Enemy Of America’ या अत्यंत वेगळ्या प्रायोगिक विस्फोटक वैचारीक लेखन असलेल्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिसाद मिळु लागला असुन बल्गेरिया येथे या पुस्तकाची दखल तेथील साहित्य क्षेत्रातील जागरूक वाचक व विचारवंतानी घेतली असुन या पुस्तकावर येथे खुली चर्चा होणार आहे.

Enemy of America हे पुस्तकाचे नावच लक्ष वेधुन घेणारे असुन या पुस्तकाबद्दल आंतरराष्ट्रीय साहित्यविश्वात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अमेरिकन राजकारणात अमूलाग्र बदल होत आहेत. नव्याने निवडुन आलेल्या ट्रम्प सरकारकडे सत्ता असुन सिनेटमध्येही त्यांचे बहुमत आहे अर्थात ही एकतर्फीच सत्ता असुन ट्रम्प सरकारला ‘गवर्निंग ट्रायफेक्टा’ सारखी ताकद मिळाली आहे.
Enemy of America मध्ये अमेरिकन महासत्ता साम्राज्यवाद निरंकुश भांडवलशाही आणि जागतिक सामाजिक राजकिय अराजकाबद्दल या पुस्तकात कोणती चर्चा लेखकाने केली आहे ? तसेच ललित व वैचारीक लेखन एकत्रित करण्याचा केलेला प्रयोग आणि मांडणीत केलेले वैचारीक धाडस आणि एखाद्या तरूण आशियाई लेखकाने अमेरिकन व युरोपीय मानसिकतेवर भाष्य करण्याचे केलेले साहित्यिक धाडस या संदर्भात या पुस्तकाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली असुन पुस्तकाचे प्रकाशक ॲंथनी मॉरिस व बल्गेरियातील तरुण लेखक वाचक वर्तुळाने या चर्चेचे आयोजन केले आहे.

तथापि आपल्या इंग्रजी लेखनाने आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी किर्ती प्राप्त केलेले डॉ.अनिल कांबळे- सरमळकर यांची ही पहीलीच युरोपीय देशातील साहित्यिक वारी असुन उत्तरोत्तर त्यांच्या लेखनाला जागतिक ओळख मिळत आहे.

Enemy Of America या पुस्तकाची अपेक्षेप्रमाणे घोडदौड सुरु झाली असुन प्रथमच बल्गेरिया सारख्या युरोपीय देशात त्याची सुरुवात झाली त्याबद्दल बोलताना लेखक डॉ. अनिल कांबळे सरमळकर म्हणाले ‘ माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे. या पुस्तकाची रचना व प्रकाशन होत असतांनाच माझ्या व प्रकाशकांच्या लक्षात आले होते की हा विषय जागतिक स्तरावरील असुन त्याला प्रतिसाद मिळणारच परंतु आमची तेवढीच मोठी जबाबदारीही आहे हे पुस्तक जागतिक वाचकांपर्यंत पोहचविणे महत्वाचे आहे. तथापि त्याची सुरुवात झाली आहे. हे पुस्तक जेवढ्या व्यापक स्तरावर भाष्य करत आहे तेवढीच माझी जबाबदारीही मोठी आहे किवा असं समजा की तेवढाच तो मोठा वैचारीक साहित्यिक धोकाही आहे त्यात व्यक्त झालेल्या विचारांना जबाबदार राहण्याचा ‘

The fox, It’s Already Tomorrow व Death of Arts या गेल्या चार वर्षांत प्रसिद्ध झालेल्या अनिल यांच्या इंग्रजी पुस्तकाने त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख किर्ती व यश मिळवुन दिले आहे मात्र Enemy Of America हे पुस्तक अत्यंत वेगळे व्यापक व विस्फोटक ठरेल व संपूर्ण जगात ते नवी चर्चा घडवून आणेल त्याची सुरुवात अमेरिका व बल्गेरियातुन सुरु झाली आहे.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles