Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे पाकिस्तानी कार्ड.! ; पण अमेरिकेन कोर्टाने दिला झटका.

वाशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाचा भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची विनंती अर्ज फेटाळला आहे. तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका न्यायाधीश एलेना कागन यांनी फेटाळली. 26/11 मुंबई हल्ल्याचा दोषी तहव्वूर राणाने भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्याने प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्याने याचिकेत म्हटले होते की, माझे भारतात प्रत्यार्पण केले गेल्यास माझा छळ होऊ शकतो. मी भारतात राहू शकणार नाही. मी पाकिस्तानी वंशाचा आहे. मुस्लीम आहे. त्यामुळे भारतात माझा अधिक छळ होऊ शकतो. तहव्वूर राणा याने त्यासाठी ह्यूमन राइट्स वॉच 2023 मधील अहवालाचा हवाला दिला. त्याने म्हटले की, त्या अहवालानुसार, भारतातील भाजप सरकार अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिमांसंदर्भात भेदभाव करत आहे.

तहव्बूर राणा याने याचिकेत म्हटले की, भारत सरकार हुकुमशाहसारखे वागत आहे. त्यामुळे माझे प्रत्यार्पण झाल्यावर माझा झळ होईल, हे निश्चित आहे. तसेच मला अनेक आजार आहेत. पार्किंसन्ससारखाही आजार मला आहे. त्यामुळे मला राष्ट्रीय, धार्मिक, सांस्कृतिक त्रास होईल, त्या ठिकाणी पाठवू नये.

कोण आहे तहव्वुर राणा? –

तहव्वुर राणा याचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. त्याचे शिक्षण आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये झाले. तो पाकिस्तानच्या आर्मीत दहा वर्षांपर्यंत डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्यानंतर त्याने ती नोकरी सोडली. तो भारताच्या विरोधात सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला. तो आता कॅनडाचा नागरिक आहे. परंतु सध्या शिकागोमध्ये राहत आहे. त्या ठिकाणी त्याने व्यवसाय सुरु केला आहे.

ADVT –

 

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles