Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

”हाय बेब, तुझ्याकडे मी भीक मागतो.!”, शेवटची चिठ्ठी लिहिली अन्… ; ‘या’ बड्या हॉटेलातील घटनेने सर्वच हताश.

मुंबई : मुंबईतील विलेपार्लेमधील सहार हॉटेलमध्ये एक भयानक घटना घडली आहे. त्या हॉटेलच्या एका रूममध्ये 41 वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेत आयुष्य संपवलं. मात्र मृत्यूपूर्वी लिहीलेल्या नोटमध्ये त्या इसमाने त्याची पत्नी आणि तिच्या मावशीवर छळाचा ठपका ठेवला आहे. निशांत त्रिपाठी नावाच्या मृत व्यक्तीने गळफास घेण्यापूर्वी त्याच्याच कंपनीच्या वेबसाइटवर सुसाईड नोट अपलोड केली होती. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

मी तुझा तिरस्कार करायचो पण..

त्या नोटमध्ये त्याने मन मोकळं केलं होतं. ‘ हे अपूर्वासाठी आहे – हाय बेब .. तू हे जेव्हा वाचशील तोपर्यंत मी गेलेला असेन. माझ्या शेवटच्या क्षणी मी तुझा तिरस्कार करू शकलो असतो पण या क्षणासाठी मी प्रेम निवडले. तेव्हा मी तुझ्यावर प्रेम केले, आताही तुझ्यावर प्रेम करतो. आणि मी वचन दिल्याप्रमाणे – हे प्रेम कधीही कमी होणार नाही. माझ्या आईला माहित आहे की मी किती संघर्ष केला आहे. त्यासाठी तू आणि प्रार्थना आंटी माझ्या मृत्यूसाठी कारणीभूत आहात. म्हणूनच मी तुला विनंती करतो, माझ्या आईकडे जाऊ नकोस. ती तुटली आहे, तिला एकटेच दु:ख सहन करू दे. ‘, असे त्याने त्यात लिहीलं होतं.

3 दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये बूक केली रूम –

त्याने आई, भाऊ आणि बहिणीला शेवटचा निरोप दिल्यानंतर पत्नी अपूर्वाला हे शेवटचे पत्र लिहिले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या 3 दिवस आधी निशांतने हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती आणि आत्महत्येच्या दिवशी बाहेर ‘डू नॉट डिस्टर्ब’ असा फलकही लावला होता.

पत्नी व तिच्या मावशीविरुद्ध गुन्हा दाखल –

या घटनेनंतर निशांत त्रिपाठीच्या आईने मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आत्महत्येनंतर पोलिसांनी प्रथम ADR दाखल केला आणि नंतर आईच्या तक्रारीच्या आधारे निशांतची पत्नी अपूर्वा पारीक आणि त्याची मावशी प्रार्थना मिश्रा यांच्याविरुद्ध बीएनएस कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित निशांतची आई कानपूरची रहिवासी आहे. तो ॲनिमेशन इंडस्ट्रीशी संबंधित होता. निशांत हा पालघर जिल्ह्यातील विरारचा रहिवासी असला तरी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये शिफ्ट झाला होता.

दरवाज्यावर लावला ‘डू नॉट डिस्टर्ब’ बोर्ड –

28 फेब्रुवारी रोजी निशांतने त्याच्या खोलीच्या दारावर ‘डू नॉट डिस्टर्ब’ बोर्ड लावला आणि बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉटेलच्या कर्मचारी त्याला हाक मारत  होते, दरवाजा वाजवत होते पण त्याने बराच वेळ प्रतिसाद न दिल्याने कर्मचाऱ्यांनी मास्टर की वापरून त्याच्या खोलीत प्रवेश केला असता समोरचं दृश्य पाहून ते हादरलेच. निशांतने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. या घटनेची मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

तपासादरम्यान पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली जी निशांतने त्याच्या कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केली होती आणि त्यावर पासवर्डही ठेवला होता. निशांतने त्याच्या सुसाईड नोटच्या शेवटी एक कविता लिहून आपल्या पत्नीवरचे प्रेम व्यक्त केले आणि मृत्यूसाठी तिला आणि तिच्या मावशीला जबाबदार धरले. निशांतच्या आईच्या तक्रारीच्या आधारे मुंबई विमानतळ पोलीस सध्या गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles