Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

असंवेदनशील, फसवेगिरी करणाऱ्यांना आता हद्दपार करा. – रुपेश राऊळ. ; माजगाव, चराठे, निरवडे येथे शेतकऱ्यांना खत वाटप, उबाठा शिवसेना सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रेला उदंड प्रतिसाद.

सावंतवाडी : आज महाराष्ट्रातील शेकडो शेतकरी बांधव या असंवेदनशील सरकारच्या धोरणांमुळे आत्महत्या करीत आहेत. ८०% समाजकारण व २०% टक्के राजकारण असा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांची शिकवण घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जनसामान्यांना आपले सरकार वाटत होते. मात्र आताचे सरकार हे १००% राजकारण आणि शून्य टक्के समाजकारण असे असून हे असंवेदनशील सरकार आहे. गेली पंधरा वर्षे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण विद्यमान मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. अशा असंवेदनशील सरकारला आता हद्दपार करून आपल्या हक्काचं अर्थात जनतेचे सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणार आहे. त्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातूनही महाविकास आघाडीच्या पाठीशी मतदारांनी उभे राहावे, असे भावनिक आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रेदरम्यान माजगाव येथे आयोजित कार्यक्रमात विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी, विधानसभा महिला संपर्क प्रमुख सुकन्या नरसुले, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जिल्हा जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुका संघटक व माजी जिल्हा परिषद सदस्य मायकेल डिसोजा, कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र म्हापसेकर, महिला संघटिका भारती कासार, श्रीमती झारापकर, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर, बाळू परब, संजय गवस, शब्बीर मणियार, अशोक दत्ताराम परब (शिवदूत), शाखाप्रमुख नरहर शिरोडकर, महिला शाखाप्रमुख पूजा पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सावंत, सविता मॅडम, भरत गावडे, दत्ताराम वराडकर, नरेश सावंत, बलवंत सावंत संतोष सावंत गणपत सावंत, बंड्या गावडे, स्वातंत्र्य सैनिक मधु सावंत, सुनंदा सावंत, रुपेश गावडे आदी उपस्थित होते.

 

यावेळी नवनियुक्त जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा महिला संपर्क प्रमुख सुकन्या नरसुले
यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनीही महायुतीच्या सरकारवर कडाडून टीका केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजगाव, निरवडे व चराठा या तीनही गावातील शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात आले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles