संजय पिळणकर.
वेंगुर्ला : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नंबर १ या प्रशालेत अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शोभा सुकुमार (चेन्नई) होत्या. सौ. शोभा सुकुमार यांनी या प्रशालेच्या ‘विठाई सभागृहा’ साठी भरीव आर्थिक मदत केली होती. त्यांनी योगायोगाने जागतिक महिला दिनी प्रशाळेला सदिच्छा भेट दिली.

अशा कर्तबगार महिलेचा सन्मान यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी प्रशाळेतील महिला शिक्षिका सौ. लीना नाईक, सौ. प्रगती आव्हाड, सौ. अनुश्री कुशे, सौ.वेंगुर्लेकर मॅडम, व्यवस्थापन समिती सदस्या सौ. स्नेहल बागडे आदींचाही सन्मान औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, समितीचे सदस्य व पत्रकार संजय पिळणकर, शाळेचे दाते शांताराम नाईक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी केले तर आभार शांताराम नाईक यांनी मानले.


